शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
3
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
4
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
5
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
6
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
7
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
8
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
9
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
10
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
11
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
12
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
13
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
14
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
15
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
16
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
17
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
18
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
19
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
20
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील

पार्थिवाला भडाग्नी दिला अन्‌ अहवाल पॉझिटिव्ह आला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 05:00 IST

काटकुंभ येथील एका ६५ वर्षीय आजारी इसमाला नजीकच्या चुरणी येथील कोविड रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तेथे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. अहवाल प्रतीक्षारत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना बुधवारी अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात  आले. रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल नसल्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.

ठळक मुद्देअनेकांच्या काळजाचा ठोका चुकला, काटकुंभ येथील घटना

नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा :  स्मशानभूमीत पार्थिवाला भडाग्नी दिला अन्‌ मृताचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची घटना तालुक्यातील काटकुंभ येथे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास उघड झाली. मृताची चिता धगधगत असताना अहवाल मिळाल्याने सर्वांची पंचाईत झाली. मात्र, आता कुणाकुणाला कोरोनाचा संसर्ग होणार, या भीतीने अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्यांची पाचावर धारण बसली. काटकुंभ येथील एका ६५ वर्षीय आजारी इसमाला नजीकच्या चुरणी येथील कोविड रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तेथे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. अहवाल प्रतीक्षारत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना बुधवारी अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात  आले. रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल नसल्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आप्तेष्टांनी मृतदेह काटकुंभ गावी आणला. सायंकाळी ६.३० वाजता अंत्यसंस्काराची तयारी झाली. मृतदेह  घरीच आल्यामुळे जवळचे काही नातेवाईक अंत्ययात्रेत सहभागी झाले. बँडबाजा वाजत अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहोचली.   यादरम्यान काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रात दैनंदिन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल आला. त्यात सदर रुग्णाचे नाव येताच गावात खळबळ उडाली. आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्मशानभूमीत जाऊन ही माहिती दिली. मात्र, तोपर्यंत मृतदेहाला भडाग्नी देण्यात आला होता. मृत हा कोरोनाबाधित असल्याचे कळताच   उपस्थितांच्या पायाखालची वाळू सरकली. परिवारातील सदस्यांसह उपस्थितांनी आरोग्य विभागावर  खापर फोडले.  परंतु, अमरावतीहून अहवाल येत असल्याचे सांगितल्यावर  तणाव निवळला. आता अंत्यसंस्कारात सहभागी व्यक्तींना कोरोना तपासणीला सामोरे जावे लागणार आहे. 

२५७ ॲक्टिव्ह रुग्णकाटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत रजनीकुंड, पाचडोंगरी, कन्हेरी, डोमा, काटकुंभ, काजलडोह ही  गावे कोरोना ‘हॉट स्पॉट’ ठरली आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एकूण २५७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

काटकुंभ येथील सदर इसमाचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता जिल्हास्तरावर प्राप्त होताच लगेच स्मशानभूमीत जाऊन नागरिकांना तात्काळ सांगण्यात आले.- आदित्य पाटील, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, काटकुंभ

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या