शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

स्वंतत्र भारतात पोपट अद्यापही कैदेत

By admin | Updated: August 13, 2016 23:55 IST

भारतात पोपट हा वन्यजीव अद्यापही कैदेत आहे. वनाधिकाऱ्यांपासून वनमंत्र्यांपर्यंत वनसंवर्धनासाठी कार्य करीत आहे.

वनविभाग जबाबदार : वन्यजीव कायद्याकडे दुर्लक्षअमरावती : भारतात पोपट हा वन्यजीव अद्यापही कैदेत आहे. वनाधिकाऱ्यांपासून वनमंत्र्यांपर्यंत वनसंवर्धनासाठी कार्य करीत आहे. मात्र, या इवल्याशा पोपटांना स्वातंत्र्य देण्यास ही सर्व यंत्रणा निकामी ठरत आहे, ही शोकांतिका अमरावती जिल्ह्यातही पहायला मिळत आहे. वनसंवर्धनात पोपटाचा मोलाचा वाटा आहे. अन्नसाखळी अबाधित ठेवण्यासाठी पोपट महत्त्वाचे कार्य करते. मात्र, पोपटांना बंदिस्त करून ठेवण्यात येत असल्याने जीवनाच्या अन्नसाखळीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. घरातील शोभा वाढविण्याच्या उद्देशाने पोपटाला पिंजऱ्यात बंदिस्त ठेवण्याची प्रथा अविरत सुरू आहे. वन्यजीव अधिनियमात मोडणारा हा पक्षी सुंदर, देखणा व गोड बोलत असल्याने नागरिक पोपटाला बंदिस्त करून ठेवतात. बहुतांश घरात पोपटाला पाळीव पक्षी बनविण्यात आले आहे. पोपटाची काही ठिकाणी छुप्या मार्गाने तर काही ठिकाणी सर्रासपणे विक्री केली जाते. हा गुन्हा मानला जातो. मात्र वनमंत्र्यांसह, वनाधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. केवळ हिंस्त्र पशूविषयी वन्यजीव कायद्यांची अमंलबजावणी केली जाते. मात्र, या इवल्याशा पोपटाला आजपर्यंत वनविभाग स्वातंत्र्य देऊ शकले नाही. जिल्ह्यात शेकडो पक्षीप्रेमी आहेत, मात्र, आजपर्यंत पक्षीपे्रंमींनी पोपटाच्या स्वातंत्र्यासाठी पुढाकार घेतला नाही. (प्रतिनिधी)