शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंग, अतिक्रमण कारवाईत समन्वय राखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2016 00:26 IST

पार्किंग आणि अतिक्रमण कारवाईदरम्यान महापालिका आणि पोलीस प्रशासनाने समन्वय राखावा,

सुनील देशमुख : महापालिकेत बैठक, सामान्य जनतेला वेठीस न धरण्याचे निर्देश, विविध विषयांवर चर्चा अमरावती : पार्किंग आणि अतिक्रमण कारवाईदरम्यान महापालिका आणि पोलीस प्रशासनाने समन्वय राखावा, अशा सूचना आ. सुनील देशमुख यांनी गुरुवारी दिल्या. त्यांनी महानगरपालिका सभागृहात विविध विषयांवर बैठक घेतली. बैठकीदरम्यान त्यांनी पार्किंग व्यवस्था, होर्डिंग्ज, बॅनर, हॉकर्स झोन, भुयारी गटार योजना, पाणीपुरवठा योजना, वाहतूक व्यवस्था आदींवर चर्चा करून निर्देश दिलेत.महावितरणद्वारे मनपाक्षेत्रात करण्यात येणाऱ्या कामांमुळे रस्त्यांची होणारी हानी, पाठ्यपुस्तक महामंडळ येथील रस्ता, मौजा वडाळी सर्व्हे क्र. ९४ मधील विकासयोजना, आरक्षण क्रमांक १७४ धोबीघाट करारनामा तीन वर्षाऐवजी ५ वर्षांचा करण्यात यावा, याविषयावर सविस्तर चर्चा करून आ. देशमुख यांनी धोबी समाज संघटनेच्या मागण्यांबाबत तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात.मजिप्रा, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहरातील भुयारी गटार योजनेबाबत समन्वय साधून ही योजना पूर्णत्वास नेण्याचे आदेश दिले. महापालिका आयुक्त पवार यांनी भुयारी गटार योजनेचे प्रॉपर्टी कनेक्शन जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत ही योजना कार्यन्वित होऊ शकणार नाही, असे सांगितले. त्यामुळे पुढील काळात याबाबत महापालिकेद्वारे काही कडक पाऊले उचलण्याचे संकेत दिलेत. शहरातील अतिक्रमणाबाबत शहर पोलीस यंत्रणा व मनपा अतिक्रमण विभाग यांनी समन्वयाने पुढील कार्यवाही करण्याचे आदेश देखील त्यांनी दिलेत.कोणतीही योजना राबविताना संबंधित विभागांना माहिती देवून काम करावे, असे सांगितले. बैठकीला आयुक्त हेमंतकुमार पवार, अधीक्षक अभियंता महावितरण अरविंद भारीकर, कार्यकारी अभियंता महावितरण दिलीप मोहोड, कार्यकारी अभियंता, मजिप्रा श्वेता बॅनर्जी, सहायक अभियंता महावितरण ज्ञानेश्वर देवतळे, प्रशांत आर.गवळी, सहायक आयुक्त निविदीता घार्गे, सोनाली यादव, शहर अभियंता जीवन सदार, सुरेन्द्र कांबळे, कार्यकारी अभियंता अनंत पोतदार आदींची उपस्थिती होती.