शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पालकांनो सावधान ! व्हॅलेंटाईन ‘डे’ ला आपल्या मुलांना सांभाळा !

By admin | Updated: February 14, 2017 00:09 IST

तालुकयातील नागठाणा, शेकदरी, गव्हाणकुंड, पंढरी परिसरातील मंदिरे व प्रकल्पावर व्हलेनटाईन ‘डे’ला प्रेमीयुगुलांचा सुळसुळाट राहणार आहे.

प्रकल्प : मंदिरात साध्या वेशात पोलीस गस्तीवर वरूड : तालुकयातील नागठाणा, शेकदरी, गव्हाणकुंड, पंढरी परिसरातील मंदिरे व प्रकल्पावर व्हलेनटाईन ‘डे’ला प्रेमीयुगुलांचा सुळसुळाट राहणार आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन साध्या वेशातील पोलिसांना तैनात करण्यात येणार आहे. रासलिला आणि पाश्चात संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्याविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. बंजरंग दलाच्यावतीने व्हॅलेंटाईन डे चा निषेध करणारे प्रसिध्दी पत्रक काढून अशा व्यभिचारींना आळा घालण्याकरिता दंड थोपाटले आहे. यामुळे पालकांनो सावधान राहून आपल्या मुलामुलींना सांभाळून निर्जन स्थळी जाणाऱ्यांना आवरण्याचे आवाहनही केले आहे.पाश्चात संस्कृतीचे दर्शन घडवून प्रेमाच्या नावावर लंैगिक शोषण करणाऱ्या सख्याहरींना धडा शिकविण्यासाठी १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेनटाईन डेला पोलीस प्रशासन सज्ज झाले आहेत. तालुक्यातील सिंचन प्रकल्प, देवस्थाने, प्रेक्षणीय स्थळे, जंगल परिसर आदी भागात प्रेमीयुगुलांवर लक्ष ठेवले जाणार आहे. वाईट कृत्य करणाऱ्याविरुद्ध कारवाईर् सुध्दा केली जाणार आहे. यासाठी पोलीस तैनात राहणार असून समाज विघातक कृत्य करणाऱ्या प्रेमीयुगुलाविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याच ठाणेदार गोरख दिवे यांनी सांगितले. दुसरीकडे बजरंग दल वरुड तालुका शाखेच्यावतीने दंड थोपाटले असून प्रेमाला विरोध नाही तर पाश्चात संस्कृतीचे दर्शन घडवून समाजाला लाजवेल असे कृत्य करणाऱ्यांना धडा शिकविण्याचा इशारा देऊन व्हॅलेंटाईन डे चा निषेध केला आहे. यासाठी स्वयसेवी संस्था आणि पोलीस लक्ष ठेवून असल्याने दुष्कृत्य टाळावे, अन्यथा कारवाईला पुढे जा, असा इशारा देण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)ठाणेदारांनी केले प्रबोधन!व्हॅलेटाईन डे' प्रेमीयुगुलांचा सावळागोंधळ थांबवण्यिाकरिता तसेच दुष्प्रवृत्तीना आळा घालण्याकरिता ठाणेदार गोरख दिवे यांनी शहरातील महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना प्रबोधन आणि मार्गदर्शन करून पाश्चात्य संस्कृतीचे अवडंबर माजवू नका. आपल्या आई-वडिलांचा कुठेही मान सन्मान हिरावला जाणार नाही, याची काळजी घ्या. प्रेमाच्या नावावर वाटेल करू नय, असे मार्गदर्शन करण्यात आले.