शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाच्या नंदनवनाचा पारा घसरू लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 22:19 IST

विदर्भाचे एकमेव पर्यटनस्थळ चिखलदरा नंदनवनाचा पारा घसरू लागला आहे. हुडहुडी भरविणाऱ्या थंडीमुळे सायंकाळी ४ पासूनच शेकोट्या पेटू लागल्या आहेत. येथे भेट देणारे पर्यटक गरम कपडे घालूनच पर्यटनाचा आस्वाद घेत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देशेकोट्या पेटल्या : चिखलदरा १० अंशावर

नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : विदर्भाचे एकमेव पर्यटनस्थळ चिखलदरा नंदनवनाचा पारा घसरू लागला आहे. हुडहुडी भरविणाऱ्या थंडीमुळे सायंकाळी ४ पासूनच शेकोट्या पेटू लागल्या आहेत. येथे भेट देणारे पर्यटक गरम कपडे घालूनच पर्यटनाचा आस्वाद घेत असल्याचे दिसून येत आहे.चिखलदरा पर्यटनस्थळ समुद्रसपाटीपासून ३६०० फूट उंचावर असल्याने वातावरण आल्हाददायक राहते. आता हुडहुडी भरणारी थंडी येथे येणाºया पर्यटकांसह नगरवासीयांनाही जाणवू लागली आहे. स्थानिक रहिवासी सायंकाळी ४ वाजतापासूनच शेकोट्या पेटवून थंडीपासून आपले संरक्षण करीत आहेत. त्यातच आठवड्यापासून ढगाळ वातावरण असतानाही पारा वधारला नाही. त्यामुळे थंडीची बोच कायम आहे. मेळघाटच्या कुशीत सर्वत्र जंगलक्षेत्र असल्याने हवेचा दाब कमी असून, गारवा वाढला आहे. दरम्यान, हवेचा वेग प्रतिसेकंद चार ते पाच मीटर नोंदविल्या गेल्याची माहिती येथील पवन ऊर्जा प्रकल्पाचे कर्मचारी गणेश पाटील यांनी सांगितले. चिखलदºयात आॅक्टोबर ते एप्रिल दरम्यान हवेचा वेग कमी असल्याचे नोंदविले गेले आहे.१६ लाखांचा महसूलचिखलदरा पर्यटनस्थळावर मोठ्या प्रमाणात दरवर्षी पर्यटक हजेरी लावतात. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत १ लाख १० हजार पर्यटकांनी हजेरी लावली असून, चिखलदरा नगरपालिकेला जवळपास १६ लाख रुपयांचा महसूल पर्यटक व वाहन करापासून प्राप्त झाला आहे. शनिवार, रविवारी पर्यटक गर्दी करतात.तिन्ही ऋतूंमध्ये वेगळी छापहिवाळा, उन्हाळा, पावसाळा, या तिन्ही ऋतूंमध्ये चिखलदरा पर्यटनस्थळ पर्यटकांना येथे येण्यास खुणावते. उन्हाळ्यात थंड हवेसाठी येथे पर्यटक येत असले तरी पावसाळा व हिवाळ्यातदेखील पर्यटकांचा ओघ कायम असतो.कमाल तापमान १६ अंशचिखलदरा पर्यटनस्थळावर १५ डिसेंबर रोजी सायंकाळी येथील सिपना महाविद्यालयात किमान तापमानाची नोंद १० अंश सेल्सिअस नोंदविले गेले. कमाल तापमान १६ अंश सेल्सिअस, तर सापेक्ष आर्द्रता ७५ टक्के असल्याची नोंद पर्यावरण विभागाचे प्राध्यापक विजय मंगळे यांनी घेतली आहे. येथे किमान तापमानाची नोंद ७ अंश सेल्सिअस राहिली आहे.