शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

संस्थात्मक प्रसूतीत पापळ पीएचसी पहिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:13 IST

अमरावती : ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या रुग्णालयांतील संस्थात्मक प्रसूतीत पापळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने प्रथम क्रमांक मिळवला आहे. गत वर्षापासून ...

अमरावती : ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या रुग्णालयांतील संस्थात्मक प्रसूतीत पापळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने प्रथम क्रमांक मिळवला आहे. गत वर्षापासून २५५ संस्थात्मक प्रसूती पापळ पीएचसीत सुखरूप पार पडल्या. कोविड काळातही येथील संस्थात्मक प्रसूतीचा दर वाढला आहे.

माता व बालमृत्यूदर कमी होण्यासाठी संस्थात्मक प्रसूती होणे गरजेचे असते. आरोग्यविषयक निर्देशांकातही संस्थात्मक प्रसूती या घटकाची गणना होते. जिल्ह्यात ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व कार्यक्षेत्रातील खासगी संस्था मिळून ५,६६६ संस्थात्मक प्रसूती झाल्या. त्यातील २,८८५ प्रसूती प्राथमिक आरोग्य केंद्रात झाल्या. जिल्ह्यात एकूण ५९ पीएचसी आहेत. पापळ येथील पीएचसी केंद्रात अडीचशेहून अधिक प्रसूती सुखरूप करण्यात आल्या. पापळ केंद्राला यापूर्वी दोनवेळा आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळाला आहे. या यशात तेथील आरोग्य सहायिका निर्मला लकडे यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे त्यांचे सगळे सहकारी व वरिष्ठ सांगतात. लकडे या २४ वर्षांपासून आरोग्यसेविका व नंतर सहायिका अशा पदावर कार्यरत आहेत. त्यांनाही फ्लॉरेन्स नाईटिंगेल पुरस्कार यापूर्वीच प्राप्त आहे.

कठीण शस्त्रक्रिया पार पाडतात

पापळ केंद्रात ३४ गावे जोडली आहेत. तिथे अनेकदा वाशिम, यवतमाळ जिल्ह्यातूनही केसेस येतात. कोविड काळात संपूर्ण सुरक्षितता व दक्षता पाळून शस्त्रक्रिया केल्या जातात. लकडे यांनी परिश्रमातून प्रसूती व संगोपनशास्त्रात कौशल्य मिळवले, त्या २४ वर्षांपासून निष्ठापूर्वक सेवा देत आहेत. त्यामुळे केंद्राचा लौकिक वाढला, असे त्यांचे सहकारी सांगतात. गतवर्षी समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या एका परप्रांतीय मजुराच्या पत्नीची प्रसूतीवेळी प्रकृती गंभीर झाली होती. बाळ गुदमरले होते. या मजुराला मराठी येत नसल्याने संवादाचीही काहीशी अडचण होती. त्यावेळी त्याच्या पत्नीची प्रकृती तपासून नेमकी समस्या काय आहे, हे श्रीमती लकडे यांनी समजून घेतले व क्षणाचाही विलंब न करता तातडीने हालचाली करून सुखरूप शस्त्रक्रिया पार पाडली. अशा अनेक कठीण शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी केल्याचे सहकारी सांगतात.

येथील टीमवर्क उत्तम

वैद्यकीय अधिकारी दीपक डाखोरे, आरोग्यसेविका सुमित्रा शेलोकार, आर. बी. गायकवाड, सुधीर बाळापुरे यांच्यासह सर्व स्टाफकडून उत्तमरीत्या टीमवर्क केले जाते. पापळ येथील सर्व सहकाऱ्यांचे पालकमंत्री यशोमती ठाकूर, जि. प. अध्यक्ष बबलू देशमुख, आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी कौतुक केले.