शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूर स्पेशल रेल्वेने १,२४१ विठ्ठलभक्त रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 22:59 IST

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून नया अमरावती (अकोली) रेल्वे स्थानकावरून मंगळवारी पंढरपूर स्पेशल पॅसेजर रवाना झाली.

ठळक मुद्देएक लाख ८५ हजारांचे उत्पन्न : नया अमरावती रेल्वे स्थानकाहून सुटली गाडी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून नया अमरावती (अकोली) रेल्वे स्थानकावरून मंगळवारी पंढरपूर स्पेशल पॅसेजर रवाना झाली. यात १,२४१ विठ्ठल भक्तांनी ७५० तिकीट घेऊन प्रवास आरंभला. या विशेष गाडीमुळे एक लाख ८५ हजार ४४५ रूपयांचे उत्पन्न रेल्वेला प्राप्त झाले आहे. आता २० जुलै रोजी दुसरी फेरी पंढरपूरकडे रवाना केली जाणार आहे. तर, पंढरपूर येथून परतीच्या प्रवासासाठी १८ व २४ जुलै रोजी स्पेशल रेल्वे गाडी सुटणार आहे.विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनी ठेवून मंगळवार, १७ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपासूनच नया अमरावती रेल्वे स्थानकावर भक्तांचे जत्थेच्या जत्थे दिसून आले. कपाळी टिळा, पांढरे शुभ्र पोषाख परिधान करून विठ्ठल भक्तांची रेल्वे स्थानकावर मांदियाळी दिसून आली. विठ्ठल भक्त पंढरपूरकडे जाणार असल्याने युवा स्वाभिमानच्या मार्गदर्शिका नवनीत राणा यांनी भक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या हस्ते फराळाचे वाटप करण्यात आले. नियोजित वेळेनुसार पंढरपूर स्पेशल रेल्वे ही दुपारी २ वाजता रवाना होणे अपेक्षित होते. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे ही गाडी दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी रेल्वे स्थानकावर आली. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता रवाना झाली. भक्तांना प्रवासात कोणतीही अडचण जाऊ नये, यासाठी मुख्य वाणिज्य खंड अधिकारी शरद सयाम, माल पर्यवेक्षक व्ही.डी. कुंभारे, मुख्य तिकीट पर्यवेक्षक पी.पी.किन्हीकर, नया अमरावती रेल्वे स्थानकाचे प्रबंधक रंगारी, रेल्वे सुरक्षा दल व रेल्वे पोलीस अधिकारी उपस्थित होते. पंढरपूर स्पेशल गाडीत १८ सामान्य डब्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.येथे थांबणार गाडीअमरावती-पंढरपूर स्पेशल रेल्वे गाडीचे थांबे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार नवीन अमरावती (अकोली), बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, भिगाव, जेजूर, कुर्डूवाडी व पंढरपूर असे थांबे देण्यात आले आहेत.