प्रवीण पोटे : जिल्ह्यातील २,५०० रस्ते घेणार मोकळा श्वास, २५० घरांच्या क्लस्टरची अभिनव संकल्पनाअमरावती : जिल्ह्यात राबविण्यात येत असलेली पालकमंत्री पांदण रस्ते विकास योजनेची दखल शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. या योजनेला लोक सहभाग कसा लाभतो, याची माहिती त्यांनी जाणून घेतली. ही योजना आता राज्यासाठी ‘पायलट प्रोजेक्ट’ म्हणून राबविली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत दिली. ग्रामीण भागासाठी पांदण रस्ते शेतकऱ्यांसाठी ‘लाईफ लाईन’ आहेत. शेतमाल घरापर्यंत व बाजारपेठेपर्यंत आणण्यासाठी अतिक्रमित पांदण रस्ते मोकळे झाल्याने शेतकऱ्यांना सुविधा झाली आहे. जिल्ह्यात अडीच हजार पांदण रस्त्याची कामे करण्यात येणार आहेत. १ हजार ३०० कि.मी. लांबीचे हे रस्ते आहेत. यापैकी ५०० पांदण रस्त्यांची काम पूर्ण झालेली आहेत. महसूल विभाग, ग्रामीण विकास व लोकसहभाग यांच्या समन्वयातून ही कामे अल्पावधित मार्गी लागली असल्याचे ना. पोटे यांनी सांगितले. एखाद्या योजनेला समर्पक नाव दिल्याशिवाय तिची अधिक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याने या योजनेला पालकमंत्री पांदण विकास योजना हे नावे दिले आहे. ही योजना तशी जुनीच आहे. मात्र नव्या स्वरुपात जिल्ह्यात राबविली जात आहे. यात लोकसहभाग असल्याने शेतकऱ्यांना या योजनेविषयी जिव्हाळा, आपुलकी निर्माण झाली आहे. लोकांनी लोकांसाठी केलेली सेवा म्हणजे पांदण रस्ते विकास, अशी या योजनेची ख्याती झाली असल्याचे ना. प्रवीण पोटे यांनी सांगितले. चांगले काम करीत असताना मदतीचे शेकडो हात पुढे येतात, असा अनुभवही त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)पालकमंत्री म्हणालेएप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हागणदारीमुक्तीसाठी नवीन संकल्पनासार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी प्रसाधनगृहांची निर्मितीव्यापारी करणार चौकांचे सौंदर्यीकरणदेखभाल दुरुस्तीही व्यापाऱ्यांकडेच जिल्ह्यात कुशल कामगारांच्या निर्मितीसाठी उपक्रम राबविणारई-टॉयलेट संकल्पना, डीपीडीसीद्वारे १५ हजारांत शौचालय उपलब्धमुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत यंदा ६२ कि.मी.च्या १६ रस्त्यांची कामेयाच योजनेत पुढील वर्षी १६१ कि.मी.चे २४ रस्त्यांची कामे होणार
पांदण योजना राज्यासाठी ‘पायलट प्रोजेक्ट’
By admin | Updated: January 31, 2016 00:10 IST