शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पॅनकार्ड क्लबचे कुलूप उघडले!

By admin | Updated: April 19, 2016 00:01 IST

पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतरही परतावा देण्यास विलंब करणाऱ्या ‘पॅनकार्ड क्लब’ या वित्तीय संस्थेचे कार्यालय अखेर सोमवारी उघडले ...

ग्राहकांचा जीव भांड्यात : परतावा केव्हा ? अमरावती : पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतरही परतावा देण्यास विलंब करणाऱ्या ‘पॅनकार्ड क्लब’ या वित्तीय संस्थेचे कार्यालय अखेर सोमवारी उघडले आणि हजारो ग्राहक-गुंतवणूकदारांचा जीव भांड्यात पडला. भाडे न भरल्याने इमारत मालकाने कार्यालय उघडण्यास मज्जाव केल्याने सोमवार ११ एप्रिलपासून हे कार्यालय कुलूपबंद झाल्याचा दावा स्थानिक व्यवस्थापनाने केला होता. तथापि कंपनीने जाहीर खुलासा दिल्याने आणि त्यातच कार्यालय कुलूपबंद झाल्याने ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. ‘कार्यालय उघडून आमची रक्कम परत करा’, असा पवित्रा अनेक संतप्त ग्राहकांनी घेतला होता. त्यामुळे आता पुढे किती दिवस कंपनीचे स्थानिक कर्मचारी ग्राहकांच्या संतापाचा सामना करू शकतात, यावर या कार्यालयाचे भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान मोठमोठी प्रलोभने दाखवून गुंतवणूक करवून घेत आता मात्र ‘आज या, उद्या या, आम्ही बोलावतोच, अशी आश्वासने न देता हा परतावा विनाविलंब द्यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. क्लब, हॉटेल आणि रूमनाईट शेअरच्या माध्यमातून देशभर वित्तीय जाळे पसरविणाऱ्या ‘पॅनकार्ड क्लब’ कर्यालयाला टाळे लागल्याचे वृत्त ‘लोकमत’ ने १५ एप्रिलला प्रकाशित केले व कंपनी व्यवस्थापनासह एजंट, ग्राहक, गुंतवणुकदारांमध्ये खळबळ उडाली. संतापाचा कडेलोटअमरावती : प्रत्येक जण एजंट आणि संबंधितांकडे संपर्क साधू लागला. त्यावेळी तांत्रिक कारणामुळे कार्यालय बंद ठेवल्याचा दावा कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापनाने केला. प्रत्यक्षात मात्र संतापाचा कडेलोट झाल्याने कार्यालय बंद करण्याचा आरोप ग्राहक- गुंतवणूकदारांनी केला होता. ग्राहकांच्या या अस्वस्थतेला ‘लोकमत’ ने लोकदरबारात नेले. त्यावर कंपनीद्वारे परतावा देण्यास विलंब होत असल्याचे मान्य करीत सोमवारी कार्यालय उघडल्याचे सांगितले गेले. सोमवारी कार्यालय उघडताच शेकडो ग्राहकांनी पॅनकार्ड क्लबच्या बडनेरा रोड स्थित कार्यालयात रांगा लावल्या आणि परतावा देण्याची विनंती केली. दीड वर्षापासून पॅनकार्ड क्लबच्या बहुतांश ग्राहकांना मॅच्युरिटीची रक्कम मिळत नसल्याने आपण नागवले तर जाणार नाही ना? अशी भीती व्यक्त होत आहे. शहरातील सुमारे दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक धोक्यात आल्याने काही ग्राहक गुंतवणूकदार पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले होते. मात्र त्यांना परतावा देण्याचे आश्वासन देत माघार घेण्यास प्रवृत्त करण्यात आले. तुर्तास तक्रारीचे सत्र थांबले असले तरी परतावा न मिळाल्यास स्फोट होऊ शकतो. (प्रतिनिधी)कंपनीची मालमत्ता विकण्यास परवानगी ग्राहकांची रक्कम परत करण्याकरिता मालमत्ता विकण्यासाठी किंवा गहाण ठेवण्यासाठी पॅनकार्ड क्लबने ‘सॅट’ न्यायालयाकडे परवानगी मागितली. न्यायालयाने तशी परवानगी कंपनीला दिली आहे. प्रसंगी कंपनी मालमत्ता विकून ग्राहकांचे पैसे देईल, असा दावा कंपनीच्या स्थानिक ‘एजन्ट्स’नी केला आहे. मार्केटिंग पर्सन्स करताहेत प्रयत्न! ग्राहकांना विश्वासात घेऊन ग्राहकांची रक्कम त्वरित मिळण्याकरिता आम्ही प्रयत्न करतो आहोत. आम्हाला २१ महिन्यांपासून कमिशन मिळालेले नाही. ग्राहकांच्या रोषाला सामोरे जात आहोत. माध्यमांनी आम्हाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा शेकडो मार्केटिंग पर्सन्सनी ‘लोकमत’ कडे व्यक्त केली आहे. थकीत भाडे आणि सुट्यांमुळे गफलत थकीत भाडे आणि लागोपाठ आलेल्या सुट्यांमध्ये पॅनकार्ड क्लबचे कार्यालय बंद होते. तशी सूचना तेथे लावण्यात आली होती. मात्र, कुणीतरी ही सूचना काढून हे कार्यालय नवीन जागेत जाणार असल्याची खोडसाळपणाची सूचना लावल्याचा दावा एस.आर.तसरे, व्ही.बी. वाकोडे, लांजेवार, उल्हे यांचासह मार्केटिंग पर्सननी केला.