शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहात पाकिस्तानी कैदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 23:17 IST

येथील मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला पाकिस्तानी कैदी आहे. या पार्श्वभूमीवर कारागृहाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. मोहम्मद जावेद असे या पाकिस्तानी नागरिक असलेल्या कैद्याचे नाव आहे. भारत- पाकिस्तान या दोन्ही देशांत निर्माण झालेल्या दुराव्यामुळे या पाकिस्तानी कैद्याला अंडा बराकीत सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देबॉम्बस्फोटातील आरोपी : २०१६ पासून भोगतोय जन्मठेपअंतर्गत, बाह्य सुरक्षेत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला पाकिस्तानी कैदी आहे. या पार्श्वभूमीवर कारागृहाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. मोहम्मद जावेद असे या पाकिस्तानी नागरिक असलेल्या कैद्याचे नाव आहे. भारत- पाकिस्तान या दोन्ही देशांत निर्माण झालेल्या दुराव्यामुळे या पाकिस्तानी कैद्याला अंडा बराकीत सुरक्षित ठेवण्यात आले आहे.राज्याच्या गृह विभागाने कारागृह प्रशासनाला सुरक्षेच्या दृष्टीने सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात ज्या कारागृहांमध्ये पाकिस्तानी नागरिक हे विविध गुन्ह्यांच्या आरोपाखाली शिक्षा भोगत आहेत, त्यांच्यावर कारागृहांच्या आत जीवघेणे हल्ले होण्याची दाट शक्यता बळावली आहे. त्यामुळे नागपूर, मुंबईच्या आर्थर रोड, येरवडा, औरंगाबाद, ठाणे आणि अमरावती मध्यवर्ती कारागृहात जेरबंद असलेल्या पाकिस्तानी कैद्यांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.कारागृहाच्या आत आणि बाहेरील सुरक्षेविषयी पोलीस प्रशासनाचे सहकार्य घेण्याचे कळविले आहे. राज्याच्या कारागृहात बॉम्बस्फोट, स्फोटक पदार्थ बाळगणे, अद्ययावत शस्त्रसाठा आढळणे, गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणणे, रेल्वे गाड्यांमध्ये बॉम्बस्फोट अशा विविध गुन्ह्यांच्या आरोपाखाली पाकिस्तानी नागरिक कैदी म्हणून जेरबंद आहेत. मध्यवर्ती कारागृहात पाकिस्तानी कैदी असल्याने सुरक्षा यंत्रणेत वाढ केली आहे. काही महिन्यांपूर्वी या पाकिस्तानी कैद्याला सामान्य बराकीत ठेवण्यात आले होते. मात्र, काश्मिरात पुलवामा येथे अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या ४० जवानांना ठार केल्यानंतर कारागृहात असलेल्या पाकिस्तानी कैद्याला अंडा बराकीत कडोकोट बंदोबस्तात ठेवले गेले. तो कारागृहात जन्मठेपेची शिक्षा सन २०१६ पासून भोगत आहे.कारागृहात प्रसिद्ध खून खटला, मोक्का, नक्षलवाद अशा विविध गुन्ह्यांतील आरोपी जेरबंद आहेत. मात्र, पाकिस्तानी कैदी मोहम्मद जावेद याला अलीकडे कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. अंडा बराकीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे. या सीसीेटीव्हीचे थेट कनेक्शन कारागृह अधीक्षकांच्या दालनात जोडण्यात आले आहे.तटाला पोलीस सुरक्षेचा वेढाकारागृहात विविध गुन्ह्यांच्या आरोपाखाली कैदी शिक्षा भोगत आहेत. मात्र, पाकिस्तानी कैदी जेरबंद असल्यामुळे कारागृह प्रशासनाने बाह्य सुरक्षेसाठी पोलीस विभागाला पत्राद्वारे कळविले आहे. त्यानुसार फ्रेजरपुरा पोलिसांनी कारागृहाच्या बाहेरील सुरक्षेच्या अनुषंगाने तटाला सुरक्षेचा वेढा दिला आहे. पोलिसांचे फिरते पथक, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट आदी सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे चित्र आहे.मोहम्मद जावेद रेल्वे बॉम्बस्फोटातील आरोपीमुंबई रेल्वे स्थानकावर सन १९९७ मध्ये गाड्यांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले होते. या घटनेतील मोहम्मद जावेद हा एक आरोपी आहे. त्याला बॉम्बस्फोटप्रकरणी जन्मठेप सुनावण्यात आली. आरोपी जावेद याला अगोदर मुंबई येथून नागपूर कारागृहात ठेवण्यात आले होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव पुन्हा अमरावती कारागृहात सन २०१६ पासून शिक्षा भोगत असल्याचे सूत्रांनी सांगितले.