अमरावती : महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुुडेवार यांची बदली तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी प्रहार युवाशक्ती संघटनेने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांचेकडे शुक्रवारी केली. दिलेल्या निवेदनात आयुक्त गुडेवार यांनी कामचुकार अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याचे काम केले आहे. गैरप्रकार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचे गंडातर आणल्याने भ्रष्टाचार करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष छोटू महाराज वसू, चंदु खेडकर, मनिष खरीसकर, भारत आमले, नवनीत उमेकर, नितीन काळे आदी उपस्थित होते.
बदलीविरोधात प्रहार आक्रमक
By admin | Updated: May 14, 2016 00:06 IST