शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

‘त्या’ पानटपरीवर अद्यापही गुंडांचा वावर

By admin | Updated: September 29, 2016 00:06 IST

येथील वाघ्र प्रकल्प कार्यालयानजीकच्या एका गल्लीत वाईन शॉपीसमोर असलेल्या पानटपरीवरच गावगुंडांचे टोळके उभे राहाते.

खुलेआम धुम्रपान : बंदीनंतरही मिळतो गुटखा, पोेलिसांनी गस्त वाढवावी अमरावती : येथील वाघ्र प्रकल्प कार्यालयानजीकच्या एका गल्लीत वाईन शॉपीसमोर असलेल्या पानटपरीवरच गावगुंडांचे टोळके उभे राहाते. राज्यात गुटखाबंदी असतानाही या पानटपरीवर खुलेआम गुटख्याची विक्री होत आहे. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानबंदी असतानाही अनेक गुंड व ईतर युवकही येथे तासनतास बसून सिगारेटचा धूर सोडत असल्याचे चित्र या पानटपरीवर दिसून येते. याठिकाणी भांबरे यांचे ‘वाईनशॉप’ आहे. येथून अनेक मद्यपी दारु विकत घेतात आणि या पानटपरीलगतच्या महापालिकेच्या फुटपाथवर अंधारात उभे राहून येथेच दारु ढोसतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. हा प्रश्न लोकमतने लोकदरबारात मांडताच गाडगेनगर पोलिसांनी धाड टाकून चार जणांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशनावर बंदी असताना देखील हे युवक खुलेआम मद्यप्राशान करताना पोलिसांना आढळले. मात्र, त्यानंतरही येथील हा गैरप्रकार पूर्णपणे बंद झालेला नसल्याने यापरिसरात सांयकाळी पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे. गाडगेनगरचे पोलीस निरीक्षक पुंडकर यांनी वाईन शॉपीच्या संचालकांना त्वरीत सुरक्षा गार्ड ठेवण्याची तंबी दिली आहे. परंतु याठिकाणी अद्यापही सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेला नाही. गांवगुंडांच्या भीतीमुळे परिसरातील तरूणी व महिलांनी दारू दुकानाच्या गल्लीतून ये-जा देखील बंद केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महापालिकेने येथे तातडीने पथदिव्यांची सोय करावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे. या गावगुंडांवर तातडीने अंकुश लावण्याची मागणी आहे. पोलिसांच्या आदेशाचे दोनच दिवस पालनयेथील सार्वजनिक बांधकाम विभागालगत वनविभागाच्या वाघ्र प्रकल्प कार्यालयासमोरील क्लासिक कमर्शिअल कॉम्पलेक्समधील दारु दुकानाजवळ असलेल्या पानपरीवर गुटखाविक्री करण्यात येत आहे. दारुचे पार्सल गांवगुडांनी विकत घेतले की रात्री उशिरापर्यंत येथील पानटपरीवरच त्यांचा तासन्तास ठिय्या असतो. त्यामुळे या परिसरात रात्री पानटपरी बंद ठेवावी, असे गाडगेनगर पोलिसांनी सांगितले असता सोमवारी व मंगळवारे असे दोनच दिवस ही पानटपरी बंद ठेवण्यात आली. परंतु बुधवारी पुन्हा ही पानटपरी सुरू आढळली. त्यामुळे याबाबत पोलीस काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.