लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शहराला लागून असलेल्या देवमाळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रहारच्या पद्मा सोळंके विजयी झाल्या. या ग्रामपंचायतसाठी रविवारी झालेल्या मतदानाची सोमवारी मतमोजणी झाली. त्यात पद्मा सोळंके यांनी भाजपच्या शारदा उईके यांचा ७७ मतांनी पराभव केला. ११ सदस्यांमध्ये भाजपचे सर्वाधिक पाच, प्रहार तीन, काँग्रेसचे दोन व एक अपक्ष सदस्य विजयी झाले.नवनिर्वाचित सरपंच पद्मा नागेश्वर सोळंके यांना ९४४ मते मिळाली, तर भाजपच्या पराभूत उमेदवार शारदा संजय उईके यांना ८६७ मते मिळाली. सरपंचांसह प्रहारचे तीन सदस्य निवडून आले असल्याने ‘गड आला पण सिंह गेला’ अशी प्रहारची राजकीय स्थिती झाली. चार वॉर्डात विजयी ठरलेल्या ११ सदस्यांमध्ये कुंदनसिंह चंदनसिंह चव्हाण (भाजप) १७१ ,मंदा सुनील भोयर (भाजप) १७८, जयश्री आशिष उईके (भाजप) २६४, शैलेश प्रतापराव म्हाला (काँग्रेस) २४८, प्रतिभा मधुकर रोंघे (काँग्रेस) १८२, प्रवीण मुरलीधर खानझोडे (प्रहार) २२५, सुनीता वासुदेव कळसकर (प्रहार) २७०, संगीता सुरज हरदे (अपक्ष) २०६, अजिंक्य प्रताप अभ्यंकर (भाजप) ३३०, प्रियंका नीलेश लायस्कर (प्रहार) २८०, वैशाली अरविंद पिहूलकर (भाजप) ३०२ मते यांचा समावेश आहे. सोमवारी सकाळी १० वाजता अचलपूर तहसील कार्यालयात मतमोजणीस सुरुवात झाली.तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी निर्भय जैन यांच्या मार्गदर्शनात सहायक निवडणूक अधिकारी सुनिल तळोकार, योगेश देशमुख, जयप्रकाश त्रिपाठी यांनी काम पाहिले. कुठलाच अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तहसील कार्यालयाबाहेर ठेवण्यात आला होता.जुने पराभूत; अजिंक्य सर्वाधिक मतांनी विजयीप्रहारचे बल्लू जवंजाळ व सहकाऱ्यांनी निवडणुकीचा किल्ला लढविला, तर भाजपतर्फे प्रताप अभ्यंकर, साहेबराव काठोळे, अभय माथने यांच्यासह दिग्गजांनी प्रहारच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायत हिसकावण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी ठरला. जि प. सदस्य प्रताप अभ्यंकर यांचे पुत्र अजिंक्य अभ्यंकर यांनी सर्वाधिक मते घेऊन विजय प्राप्त केला, तर प्रहारचे दोन सदस्य पाच मतांच्या फरकाने निवडून आलेत. येत्या मे महिन्यांत जुन्या सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. जुन्यांपैकी एकही सदस्य निवडून आला नाही.
देवमाळी ग्रामपंचायत सरपंचपदी प्रहारच्या पद्मा सोळंके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 23:25 IST
शहराला लागून असलेल्या देवमाळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रहारच्या पद्मा सोळंके विजयी झाल्या. या ग्रामपंचायतसाठी रविवारी झालेल्या मतदानाची सोमवारी मतमोजणी झाली. त्यात पद्मा सोळंके यांनी भाजपच्या शारदा उईके यांचा ७७ मतांनी पराभव केला. ११ सदस्यांमध्ये भाजपचे सर्वाधिक पाच, प्रहार तीन, काँग्रेसचे दोन व एक अपक्ष सदस्य विजयी झाले.
देवमाळी ग्रामपंचायत सरपंचपदी प्रहारच्या पद्मा सोळंके
ठळक मुद्देसिंह आला पण गड गेला : भाजप ५, प्रहार ३, काँग्रेस २, एक अपक्ष विजयी