शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

ऑक्सिजन, रेमडेसिविर अन् लसही वेटिंगवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 05:00 IST

कोरोनावर सध्या रेमडेसिविर इंजेक्शन गुणकारी ठरत असल्याने गंभीर रुग्णांचा पाच इंजेक्शनचा कोर्स केला जातो. दररोज दोन ते अडीच हजार इंजेक्शनची मागणी असताना चार दिवसांपूर्वी जिल्ह्याकरिता ७०० इंजेक्शन उपलब्ध झाले आणि त्याच दिवशी संपले. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या डोससाठी इंजेक्शन कुठून आणावे, असा गंभीर रुग्णांच्या नातेवाइकांसमोर प्रश्न निर्माण झाला. 

ठळक मुद्देअपुऱ्या पुरवठ्यामुळे यंत्रणा हतबल, ऑक्सिजनसाठी प्रशासनाची कसरत, इन्जेक्शनचाही साठा संपला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी आवश्यक रेमडेसिविर सद्यस्थितीत ठणठणाट व ऑक्सिजनचा जेमतेमच साठा आहे.  यासोबतच कोरोना प्रतिबंधक लसीचा साठा संपल्याने जिल्ह्यातील १०० हून अधिक केंद्रे बंद आहेत. त्यामुळे कोरोनाशी कसे लढणार, असा नागरिकांचा सवाल आहे.कोरोनावर सध्या रेमडेसिविर इंजेक्शन गुणकारी ठरत असल्याने गंभीर रुग्णांचा पाच इंजेक्शनचा कोर्स केला जातो. दररोज दोन ते अडीच हजार इंजेक्शनची मागणी असताना चार दिवसांपूर्वी जिल्ह्याकरिता ७०० इंजेक्शन उपलब्ध झाले आणि त्याच दिवशी संपले. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या डोससाठी इंजेक्शन कुठून आणावे, असा गंभीर रुग्णांच्या नातेवाइकांसमोर प्रश्न निर्माण झाला. ऑक्सिजनचा पुरवठाही जेमतेम होत आहे. अद्याप कमी पडला नसला तरीही पुरेसा नाही. ही यंत्रणांची खंत आहे. यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम लक्ष देऊन आहेत. जिल्ह्याबाहेरील रुग्ण मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्याने शासकीय अन् खासगी रुग्णालयांत बेडचा तुटवडा अलीकडे जाणतो आहे.कोरोना प्रतिबंधात लसीकरण महत्त्वाचे आहे. सुरुवातीला लसीचा साठा भरपूर होता, मात्र, लसीकरणाचे आणखी दोन टप्पे वाढविले असताना मागणीच्या तुलनेत डोजचा पुरवठा होत नाही. जिल्ह्यातील १२५ पैकी ७० केंद्र बंद आहेत. रविवारी आणखी ३० ते ४० केंद्रे बंद पडण्याची शक्यता आहे. 

रेमडेसिविरचा पुरवठाच नाही, वाटपाचे केंद्रही बंदजिल्ह्यात दोन ते अडीच हजार इंजेक्शनची मागणी रोज होत आहे. त्यातुलनेत एका आठवड्यात फक्त १४५० व्हायल जिल्ह्याला मिळाले. व्यावसायिकांनी ३० लाखांची  आगाऊ रक्कम डेपोकडे जमा केलेला असताना अद्याप पुरवठा झालेला नाही. त्यामुळे पीडीएमएमसीतील केंद्रात मोठ्या प्रमाणात रांगा दिसून आल्या.पुढे काय? शनिवारी पीडीएमएमसी केंद्रात ४५० इंजेक्शन उपलब्ध झाले. याशिवाय आवश्यक व्हायल पुरवठ्याची प्रतीक्षा आहे.

सुपर स्पेशालिटीला रोज लागतो ४.५ टन ऑक्सिजनयेथील सुपरस्पेशालिटीमधील जिल्हा कोविड रुग्णालयात रोज चार टन ऑक्सिजन लागतो. शनिवारी ४.११ टन ऑक्सिजन उपलब्ध होता. येथे ऑक्सिजन पुरवठ्यासाठी रोज लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध होत असल्याने अद्याप तरी टंचाई नसली तरी सध्या असणारा पुरवठा जेमतेमच असल्याची स्थिती आहे.पुढे काय : शासकीय रुग्णालयात सध्या तरी पुरेसा साठा होत असला तरी हे रुग्णालय पुरवठादारावरच अवलंबून आहे.

जिल्ह्यातील १०० लसीकरण केंद्र साठ्या अभावी बंदजिल्ह्यात शनिवारी कोव्हॅक्सिनचे चार हजार डोज शिल्लक होते. याचा दिवसभर वापर झाल्यानंतर हा साठा संपणार आहे. कोविशिल्डचा साठा चार दिवसांपूर्वीच संपुष्टात आला. त्यामुळे जिल्ह्यातील १०० हू अधिक केंद्रे रविवारपासून बंद राहतील. जिल्ह्यात लस महोत्सवाची वाट लागली आहे.पुढे काय : जिल्ह्यात चार ते पाच हजार कोव्हॅक्सिनचे डोज प्राप्त होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे २५ केंद्रे सुरू राहतील.

जिल्ह्यात लसीचे डोस उपलब्ध नसल्यामुळे सर्व लसीकरण केंद्र रविवारपासून बंद राहण्याची शक्यता आहे. याशिवाय रेमडेसिविरचा साठा सरप्लस नाही. प्रोटोकॉलनुसार रुग्णांना पाहिजे तेवढा साठा उपलब्ध आहे. याशिवाय ऑक्सिजनचा साठादेखील पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध आहे. - शैलेश नवाल जिल्हाधिकारी

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस