शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

आॅक्सिजन पार्कमध्ये एका वर्षात २० फूट वृक्षांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 21:46 IST

येथील जुन्या बायपासलगत असलेल्या आॅक्सिजन पार्कमध्ये एका वर्षांत २० फुटांपर्यंत वृक्षांची ऐतिहासिक वाढ झाली आहे. जागतिक वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून या वृक्षांची सजावट आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करून वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देवृक्षांची सजावट, रांगोळी स्पर्धा : जागतिक वन्यजीव सप्ताहांतर्गत उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील जुन्या बायपासलगत असलेल्या आॅक्सिजन पार्कमध्ये एका वर्षांत २० फुटांपर्यंत वृक्षांची ऐतिहासिक वाढ झाली आहे. जागतिक वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून या वृक्षांची सजावट आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करून वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेतला आहे.अमरावती - बडनेरा मार्गावर जुन्या बायपासलगत काँग्रेसनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वनविभागाची खुली जागा होती. या जागेवर महापालिका सफाई कर्मचारी कचरा टाकून परिसरात पसरवीत होते. काहींनी ही जागा अतिक्रमण करण्याचे मनसुबे बांधले होते. मात्र, पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख, मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांच्या पुढाकाराने या खुल्या जागेवर आॅक्सिजन पार्क साकारण्याचा निर्णय झाला. त्याअनुषंगाने गतवर्षी राज्याचे वने व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आॅक्सिजन पार्कची पायाभरणी करण्यात आली. आता वर्षभरानंतर या पार्कमध्ये विविध प्रजातींच्या वृक्षांचे संगोपन, संवर्धन करण्यात आले आहे. भकास असलेला हा परिसर हिरवळमय झाला आहे. एका वर्षात २० फुटांपर्यत वृक्षांची ऐतिहासीक वाढ करण्यासाठी उपवनसंरक्षक हरिश्र्चंद्र वाघमोडे, सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. तर, २५ फुटांपर्यंत बांबुची वाढ करण्यात आली असून, या वृक्षांचा पहिला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वन्यजीव सप्ताहाचे औचित्य रविवार, ७ आॅक्टोबर रोजी भव्य वृक्ष सजावट आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वृक्ष सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या शाळांना एकूण ५ सायकली प्रदान केल्या जातील. रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या शाळांना एकूण ५ सायकली प्रदान केल्या जातील. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना लकी ड्रॉ पद्धतीने पाहुण्यांच्या उपस्थितीत ५१ सायकली प्रदान केल्या जातील, अशी माहिती वन विभागाने दिलीआॅक्सिजन पार्कमध्ये वर्षभरात वनकर्मचाऱ्यांच्या श्रमातून तयार झालेल्या वृक्षांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. शालेल विद्यार्थ्यांसाठी वृक्ष सजावट व रांगोळी स्पर्धा घेतली जाईल. गरजूंना लोकसहभागातून सायकली वाटप केल्या जातील.- अशोक कविटकर,सहायक वनसंरक्षक