शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पीडीएमसीत प्राणवायूचा तुटवडा, कोणतीही अप्रिय घटना नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:14 IST

चार रुग्णांचे वाचविले प्राण, तासाभराच्या प्रयत्नानंतर परिस्थिती नियंत्रणात अमरावती : येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात बुधवारी सायंकाळी ...

चार रुग्णांचे वाचविले प्राण, तासाभराच्या प्रयत्नानंतर परिस्थिती नियंत्रणात

अमरावती : येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास प्राणवायूचा तुटवडा झाल्याने तारांबळ उडाली. अतिदक्षता विभागात उपचार घेणारे कोविड, नॉन कोविड रुग्णांच्या सेवेसाठी धावपळ झाली. अखेर तासाभरांच्या प्रयत्नानंतर डॉक्टरांच्या चमुने परिस्थिती नियंत्रणात आणली, हे विशेष.

पीडीएमसीत बुधवारी सायंकाळी ७ वाजता प्राणवायूचा तुटवडा झाल्यामुळे तारांबळ उडाली होती. मात्र, यात कोणतीही अप्रिय घटना घडली नाही, असे रुग्णालयाने गुरुवारी स्पष्ट केले. अतिदक्षता विभागात कोविड, नॉन कोविड रुग्ण उपचार घेत असताना सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास प्राणवायूचा तुटवडा डॉक्टर व त्यांच्या चमूला जाणवला. रुग्णसेवेसाठी नातेवाईकांनी डॉक्टरांची भेट घेतली. त्यानंतर पीडीएमसीची वैद्यकीय चमू, कर्मचारी, सुरक्षा रक्षकांनी दक्षता घेत गर्दी होऊ नये, यासाठी पीडीएमसीचे मु्ख्य प्रवेशद्धार काही वेळेसाठी बंद केले. दरम्यान पीडीएमसीतील अतिदक्षता विभागातील चार रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. काही वेळेतच इर्विनमध्ये या चारही रुग्णांना प्राणवायू उपलब्ध करून दिला आणि या रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. पीडीएमसीच्या चमुंनी रुग्णांना पुन्हा प्राणवायू उपलब्ध करून देण्यासाठी केलेली धावपळ खरेच रूग्णसेवेचे प्रतीक ठरले.

-------------

कोट

रुग्णालयांत प्राणवायूचा तुटवडा आहे. यातून मार्ग काढला जात असून, प्राणवायू मुबलक प्रमाणात लवकरच उपलब्ध होईल. रुग्णसेवा आणि लोकांच्या जीवाची काळजी घेतली जात आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करुन आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे.

- यशोमती ठाकूर, पालकमंत्री.

कोट

रुग्णालयात केवळ प्राणवायूचा तुटवडा झाला होता. मात्र, रुग्णालयातील चमूने ही परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळली. तासाभरातच कोविड, नॉन कोविड रुग्णांना प्राणवायू उपलब्ध करून देण्यात आला.

- अनिल देशमुख, अधिष्ठाता, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय