शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेनंतर 'व्हिजन डाक्युमेंट'चे अवलोकन !

By admin | Updated: February 1, 2017 00:10 IST

राज्य शासनामार्फत सुरू केलेल्या 'आमचं गाव आमचा विकास' या हितकारक योजनेला ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहेत.

८३९ ग्रामपंचायतींचा समावेश : ग्रामविकासाला मिळणार गतीअमरावती : राज्य शासनामार्फत सुरू केलेल्या 'आमचं गाव आमचा विकास' या हितकारक योजनेला ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहेत. जिल्हाभरातील ८३९ ग्रामपंचायतींचे 'व्हिजन डाक्युमेंट' अवलोकनार्थ जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने गाव विकासाला चालना मिळणार आहे.राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखाली पंचायत समिती कार्यालय आदी प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्था व या प्रणालीतील सर्व प्रशासकीय अधिकारी एकत्रितरीत्या जिल्हाभरातील ८३९ ग्रामपंचायतींमध्ये 'आपलं गाव आपला विकास' उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीत तीन दिवस विविध उपक्रम राबवून विकासाचा नियोजन आराखडा तयार करून पंचायत समितीकडे पाठविण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक गावात तीन दिवसांचा सूक्ष्म नियोजन कार्यक्रम राबविण्यात आला असून आरोग्य, शिक्षण, जलसंधारण, पशुसंवर्धन आदींचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले. यासाठी सरपंच, उपसरपंच, सदस्य, पशुधन पर्यवेक्षक, आशा वर्कर, आरोग्य सेवक, सेविका, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, युवक-युवती गट, ग्रामसेवक, तलाठी, बचतगटातील सदस्य, अध्यक्ष, कृषी सहायक, जलसुरक्षारक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामरोजगार सेवक, वनपाल, स्वयंसेवक, ग्रामपंचायत सेवक आदींसह ग्रामपंचायतींच्या सर्व समित्यांचे सदस्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)तांत्रिक समितीने केली आराखड्याची तपासणीआमचं गाव आमचा विकास कार्यक्रमांतर्गत २२ जुलै ते १४ आॅगस्टदरम्यान गावाचा विकास आराखडा सादर करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात गावाचा विकास आराखड्याची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली, तर दुसऱ्या टप्प्यात पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायती प्रारूप आराखडे तयार करण्यासाठी बैठका, चर्चासत्र, दिंडी, मशालफेरी काढून गावात जनजागृती करण्यात आली. त्यानंतर पंचायत समितीकडे सादर केलेल्या आराखड्यांची तांत्रिक समितीकडे तपासणी करून सदर आराखडे जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आले आहे. सादर आराखडे अवलोकनार्थ जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सादर केले जाणार आहे. नियोजनानुसार संबंधित गावांमधील विविध विकासकामे सुरू होणार आहेत.दृष्टिक्षेपात तालुकानिहाय ग्रामपंचायतीजिल्हाभरातील १४ तालुक्यांतर्गत एकू ण ८३९ ग्रामपंचायती आहेत. यामध्ये अमरावती ५९, अंजनगाव सुर्जी ४९, भातकुली ४८, चिखलदरा ५३, धारणी ६२, दर्यापूर ७४, नांदगाव खंडेश्र्वर ६८, चांदूरबाजार ६७, चांदूररेल्वे ४९, अचलपूर ७०, तिवसा ४५, मोशी ६७, वरूड ६६, धामणगाव रेल्वे ६२ आदी ग्रामपंचातींचा समावेश आहे.