लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मद्य पाजून एका महिलेवर रात्रभर अत्याचार करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.मोहित मैत्रे (३३, रा. बियाणी चौक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या मोहितचे पीडित २६ वर्षीय महिलेसोबत तिच्या मैत्रिणीच्या माध्यमातून ओळख झाली होती. महिलेने तिच्या मैत्रिणीकडून १५ हजार रुपये उसने घेतले होते. सदर पैसे मैत्रीण त्या महिलेला परत मागत होती. मात्र, महिलेजवळ तिला परत करायला पैसे नव्हते. त्यामुळे ती याबाबत सांगण्यासाठी ती मैत्रिणीकडे गेली असता, यावेळी मोहित तिथे हजर होता.मैत्रिणीने मोहितची ओळख सदर महिलेशी करून दिली. यावेळी मोहितने महिलेचा भ्रमणध्वनी क्रमांक घेतला. त्यानंतर तो महिलेला वारंवार कॉल करून तिच्यासोबत संबंध वाढविण्याचा प्रयत्न करीत होता.दरम्यान, महिलेच्या मैत्रिणीच्या आईची प्रकृती बिघडली. त्यामुळे मैत्रिण महिलेकडे वारंवार पैशांची मागणी करीत होती. ३० जानेवारी रोजी मोहितने महिलेला कॉल केला. मैत्रिणीला पैसे परत करण्यास मी तुझी मदत करू शकतो, असे म्हणून त्याने महिलेला आपल्या घरी बोलाविले. त्यानुसार पीडित महिला मोहितच्या घरी गेली.मोहित त्याच्या घरी दोन सहकाऱ्यांसोबत मद्यप्राशान करीत होता. सहकारी निघून गेल्यानंतर त्याने पीडित महिलेला जबरीने मद्य पाजले. मदत करतो, असे म्हणून त्याने महिलेला रात्री घरी थांबवून घेतले. त्यानंतर रात्रभर वारंवार मोहितने सदर महिलेचे लैंगिक शोषण केले. याप्रकरणी पीडिताने शनिवारी फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मोहितला अटक करून त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्योती बळेगावे करीत आहेत.
मद्य पाजून विवाहित महिलेवर रात्रभर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 06:00 IST
मोहित मैत्रे (३३, रा. बियाणी चौक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या मोहितचे पीडित २६ वर्षीय महिलेसोबत तिच्या मैत्रिणीच्या माध्यमातून ओळख झाली होती. महिलेने तिच्या मैत्रिणीकडून १५ हजार रुपये उसने घेतले होते. सदर पैसे मैत्रीण त्या महिलेला परत मागत होती. मात्र, महिलेजवळ तिला परत करायला पैसे नव्हते.
मद्य पाजून विवाहित महिलेवर रात्रभर अत्याचार
ठळक मुद्देआरोपीस अटक : शहरातील घटना