शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरलोड ट्रकची चाके थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 22:07 IST

राष्ट्रीय महामार्गाच्या कामात कंत्राटदार अवैध खणन करून रस्त्याच्या बांधकामात ओव्हरलोड ट्रकद्वारा पिवळी मातीचा वापर करीत आहे.

ठळक मुद्देउपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश : अवैध खणन, जड वाहतुकीला चाप

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : राष्ट्रीय महामार्गाच्या कामात कंत्राटदार अवैध खणन करून रस्त्याच्या बांधकामात ओव्हरलोड ट्रकद्वारा पिवळी मातीचा वापर करीत आहे. हे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणताच उपविभागीय अधिकाऱ्यांतर्फे या प्रकरणाची गंभीर दखल घेत, कंत्राटदाराच्या ट्रकची वाहतूक बंद करण्याचे निर्देश दिले तसेच खणनसुद्धा बंद करण्यात आले आहे.परतवाडा ते मोर्शी मार्गावर सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात पिवळ्या मातीचा वापर होत आहे. ही माती मौजे पिंपळखुटा भागातील ई-क्लास जमीन खोदून काढली जात आहे. या भागात कंत्राटदार एचजी इन्फ्रा कंपनीतर्फे ३० ते ४० फूट खोल खोदण्यात आले आहे. त्यांच्याच आठ मोठ्या ट्रकमध्ये ६-७ ब्रास माती भरून वाहतूक करीत असल्याचे सत्य ‘लोकमत’ने उघडकीस आणले.यामध्ये कंत्राटदारतर्फे उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांच्या परवानगीच्या संशयास्पद रॉयल्टी पासवर दररोज शेकडो ब्रास गौण खनिजाचे खणन सुरू होते. ही बाब गंभीरतेने घेत उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाने कंत्राटदाराला उत्खनन बंद करण्याचे निर्देश देऊन ट्रकची वाहतूकसुद्धा बंंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी ‘लोकमत’ला दिली.खड्डे बुजविण्यास सुरुवातसदर प्रतिनिधीने उत्खननस्थळी भेट घेतली असता, खणन बंद करून लेव्हल मशीनद्वारे या जागेतील खड्डे बुजविणे सुरू होते. कंत्राटदाराचे चार जेसीबी व सात ट्रक उभेच असल्याने महसूल विभाग वेळाने का होईना, खडबडून जागे झाले, हे निश्चित. मातीने भरलेल्या ट्रकची वाहतूक बंद झाल्याने कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराने त्रस्त नागरिकांना गुुरुवारी मोठा दिलासा मिळाला आहे.