शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

५० दिवसांत ६० महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी,१३ व्यक्ती मृत

By admin | Updated: July 19, 2016 00:15 IST

जिल्ह्यात २८ मे ते १८ जुलै या कालावधीत म्हणजेच ५० दिवसांत ६० महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. यामध्ये १३ व्यक्ती व २२ जनावरे मृत झाली.

अमरावती : जिल्ह्यात २८ मे ते १८ जुलै या कालावधीत म्हणजेच ५० दिवसांत ६० महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. यामध्ये १३ व्यक्ती व २२ जनावरे मृत झाली. २८ गावांतील ४३५ कुटुंबे बाधित झालीत व १७० व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. जिल्ह्यात १ जून ते १८ जुलै दरम्यान ३०६.५ मि.मी. पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४६७.५ मिमी पाऊस पडला ही १५२.५ टक्केवारी आहे. मागील वर्षी याच दिनांकाला १५२.५ मिमी पाऊस पडला होता. यंदा २० जूनला मान्सूनचा पहिला पाऊस पडला. त्यानंतर आठ दिवस पावसाचा खंड होता व २७ जूनपासून पाऊस सुरू झाला ते आतापर्यंत २६० महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. यामध्ये सर्वाधिक ११ जुलै रोजी २५ मंडळात अतिवृष्टी झाली. यंदा २८ जून रोजी डवरगाव ७५ मि.मी., पापळ ७३, वऱ्हा १५५, कुऱ्हा ७२.२. २ जुलै रोजी हिवरखेड ८५, चुर्णी ७४, तिवसा ७२, कुऱ्हा ७२, मोर्शी ८२.३, अंबाडा ७४.२, हिवरखेड ६६.१, ३ जुलै रोजी अंबाडा ७१.६, सातेफळ ६८ व ९ जुलै रोजी वडाळी ६८, माहुली ६९, चांदूररेल्वे ८२.६, आमला ८४.८, घुईखेड १०२, सातेफळ ९६, पळसखेड ६५, धामणगाव १३२.४, अंजनसिंगी ६७, तळेगाव १०२, दत्तापूर ११४.५, मंगरुळ दस्तगीर १०९.४, चिंचोली ९०, भातकुली १०२, वरखेड ७३, वऱ्हा ६५.४, मोझरी ६९.८, लोणी ७२.४, राजुरा ७६.४, चिखलदरा ८५.४, टेंभुरसोडा ७२.४, सेमाडोह १००, चुर्णी महसूल मंडळात ९७.४ मिमी पाऊस पडला. (प्रतिनिधी)११ जुलैला सर्वाधिक २५ मंडळात अतिवृष्टीयंदाच्या पावसाळ्यात ११ जुलै रोजी सर्वाधिक २५ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. यामध्ये अमरावती महसूल मंडळात वलगाव १०५ मिमी, शिराळा ८५, अचलपूर ९३, परतवाडा १०२, परसापूर ८०.३, रासेगाव ८७, असदपूर ८१.५, पथ्रोट १३१, दर्यापूर ८०.३, येवदा ८३, थिलोरी ८८.१, रामर्थि ८२, सामदा ७९, अंजनगाव ७९, सातेगाव ६५, कापूसतळणी ८४, भंडारज ९०, विहिगाव ७०, कोकर्डा ८५, धारणी ७२, धुळघाट ११३, हरिसाल ७३, सावलीखेडा १०७, चिखलदरा १७२ व सेमाडोह महसूल मंडळात १८३.४ मिमी पाऊस पडला. ंअसे झाले नुकसानया ५० दिवसात १३ व्यक्ती मृत झाले. यापैकी ८ व्यक्तीच्या अंगावर वीज पडल्याने दोन व्यक्ती पुरात वाहून गेल्याने, तर तीन व्यक्तींचा अंगावर घराची भींत पडल्याने मृत्यू झाला. पावसाने २८ गावातील ४३५ कुटुंब बाधित झाले व १७० व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. ११ दुधाळ जनावरे व ९ जनावरे मृत पावली आहे. मृत व्यक्तींच्या वारसाला २८ लाख व जनावरांना २८ हजारांची मदत शासनाद्वारा देण्यात आली. ७६२ घरांची पडझडपावसाच्या ५० दिवसांत ७६२ घरांची पडझड झाली आहे. यामध्ये ११ घरे पूर्णत: उद्ध्वस्त झाले. १०७ पक्या घरांची अंशत: पडझड, ५२२ कच्च्या घरांची अंशत: पडझड झाली. तर ११२ झोपड्या पूर्णत: नष्ट झाल्या आहेत व १० गोठ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.