शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

प्रकोप; एकाच कुटुंबातील तिघांचा कोरोनाने घेतला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 14:12 IST

Amravati news तेरा दिवसांपूर्वी वडील तर मायलेक केवळ सहा तासाच्या अंतरात कोरोनाच्या नियतीने हिरावून घेतले. दरम्यान  धामणगाव तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रकोप आताही कायम असल्याने सर्वांनी सतर्क राहण्याचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.

ठळक मुद्देआई, अन् मुलाचा सहा तासाच्या फरकाने मृत्यू 

मोहन राऊत

लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती: तेरा दिवसांपूर्वी वडील तर मायलेक केवळ सहा तासाच्या अंतरात कोरोनाच्या नियतीने हिरावून घेतले. दरम्यान  धामणगाव तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रकोप आताही कायम असल्याने सर्वांनी सतर्क राहण्याचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.

             धामणगाव शहरातील रहिवासी प्रगतशील शेतकरी असलेल्या देशमुख कुटुंबातील तिघांचा कोरोनाने बळी घेतला. वडिलांचा तेरा दिवसांपूर्वी तर आई आणि मुलाचा एकाच दिवशी बुधवारी यवतमाळ येथे उपचार दरम्यान मृत्यू झाला. अख्खे देशमुख कुटुंबच कोरोनाचे बळी ठरले आहेत.

             गत आठवड्यात सोनेगाव खर्डा येथील दोन चुलत भावांपैकी एकाचा नागपूर तर दुसऱ्याचा अमरावती येथे एकाच दिवशी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तालुक्यातील दहा कोरोना रुग्ण अमरावती, नागपूर, यवतमाळ येथील खासगी व सरकारी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

धामणगाव तालुक्यातील ५८ गावात कोरोनाचा शिरकाव

शहर व तालुक्यातील २ हजार ३६३ जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली. यात ५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या तालुक्यात २५५ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. या कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असला तरी आकडेवारी कमी होण्याची चिन्ह दिसत नाही. मागील १४ दिवस जिल्हा प्रशासनाने घोषित केलेल्या कडक निर्बंधाचे पालन ग्रामीण भागात पाहिजे त्या प्रमाणात झाले नसल्याने काही गावात आजही कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही.

कोरोनाला सहज घेणे बेततेय जीवावर

मागील १५ दिवसांत कोरोना रुग्णाचा चढता आलेख, यात १५ वर्ष आतील रुग्णात होणारी झपाट्याने वाढ, सोबतच मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने कोरोना आजाराला सहज घेणे जीवावर बेतत आहे. प्रत्येक ग्रामस्थांनी घराबाहेर येऊन चाचण्या करून घ्याव्यात, यासाठी येथील तहसीलदार गौरवकुमार भळगाठींया हे घरोघरी जाऊन तपासणीसाठी आग्रह करीत आहे. तालुका आरोग्य अधिकारी हर्षल क्षीरसागर हे गावागावात चाचणी शिबिरे घेत आहेत. तर शहरात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश साबळे हे प्रत्येक चौकात चाचणी घेत आहेत. दोन दिवसाआड एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू होत असताना आजाराची भयावह ग्रामस्थांच्या केव्हा लक्षात येणार असा प्रश्न निर्माण होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस