शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आमचा रोजगार हिरावला हो...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:07 IST

विविध देवी-देवतांची सोंगे घेऊन मनोरंजनातून उदरनिर्वाह करणाºया बहुरूपी समाजाचा रोजगार चोरांच्या दहशतीमुळे हिरावला असून,.....

ठळक मुद्देबहुरूपी समाजाचा टाहो : चोरांच्या दहशतीचा परिणाम; तक्रार करावी तरी कुणाकडे ?

वीरेंद्रकुमार जोगी।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विविध देवी-देवतांची सोंगे घेऊन मनोरंजनातून उदरनिर्वाह करणाºया बहुरूपी समाजाचा रोजगार चोरांच्या दहशतीमुळे हिरावला असून, गावागावांत फिरून लोककला जपणाºया या मंडळींसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. याची तक्रार करावी तरी कुणाकडे, असा त्यांचा सवाल आहे.तिवसा तालुक्यातील कुºहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्डी येथे सहा बहुरूपींना मारहाण केल्याची घटना २४ आॅक्टोबर रोजी उघडकीस आली. मार्डीत आलेले बहुरूपी नव्हतेच. कारण त्यांनी स्त्रीवेश धारण केला होता. बहुरूपी कधीच स्त्रीवेष करीत नाहीत, असा दावा बहुरूपी समाजाच्या प्रतिनिधींनी केला आहे. मात्र, यानंतर हे रोजगाराचे साधनच नष्ट झाल्यात जमा असल्याचे बहुरूपींचे मत आहे.बहुरूपी स्वत:ला लोककलावंत मानतात. उदरनिर्वाहासाठी देव-देवतांची सोंगे घेतात. आख्यायिकांच्या माध्यमातून देवतांचे वर्णन करतात. ही परंपरा त्यांनी वर्षानुवर्षे जपली आहे. त्यांचे कोणतेही लिखित साहित्य नाही, तर मौखिक व श्राव्य माध्यमातून पिढ्यान्पिढ्या बहुरूपी आपली कला जोपासत आहेत. बहुरूपींची नावे हिंदू-मुस्लिम धर्मीयांतील नावाची सरमिसळ असल्याने त्यांचा धर्म कोणता, जात कोणती, हे कळत नाही. आम्ही हिंदू व मुस्लिम या दोन्ही धर्मातील सण साजरे करतो, असे बहुरूपी जनजागृती कला मंच संघटनेचे राजकपूर शमशेर पठाणेकर यांनी सांगितले.छत्रपतींचा सेवक बहुरूपीछत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना अठरापगड जातींच्या लोकांना सोबत घेतले होते. त्यात बहुरूपी समाजाचाही समावेश होता. छत्रपतींना औरंगेजेबाने आग्य्रात नजरकैदेत ठेवले, त्यावेळी बहुरूपी बहिरजी नाईक यांनी त्यांचे वेशांतर केले होते. छत्रपतींसोबत कायम एक बहुरूपी असायचा, असे जाणकार बहुरूपी सांगतात.शिक्षणापासून वंचितबहुरूपी उदरनिर्वाहासाठी सोंगे घेऊन देशभर हिंडतो. कुटुबांचीही पायपीट सुरूच असते. अशातच मुलांना शिक्षण घेता येत नाही. एखाद्याने मुलाला शाळेत घातल्यास त्याला जातीचा उल्लेख असलेली शासकीय कागदपत्रे मागितली जातात. ती नसल्याने बहुरूपी समाजातील मुले शिक्षणापासून आजही वंचित आहेत.आम्ही लोककला जपत आहोत. मात्र, गावात प्रवेश केल्यावर लोक संशयाच्या नजरेने पाहतात, आम्हाला चोर समजून गावातून हाकलून लावतात. अशा घटना वाढल्या आहेत.- राजेश चांद औंदकर,अध्यक्ष, बहुरूपी बहुउद्देशीय संस्था