येवदा : येथील शहानूर नदीच्या पुलावरून पडून उत्तमराव बिसन वाघ (६५) यांचा जागेवरच मृत्यू झाला. शहानूर नदीच्या पुलाजवळ रहदारीच्या मार्गावर दारूचे दुकान असल्यामुळे तेथे नेहमी वाहतूक विस्कळीत होते. बुधवारी सायंकाळी घरी परत येताना पुलावरील कठडे तुटलेले असल्याने उत्तमराव वाघ यांचा तोल गेल्याने ते नदीत कोसळले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आज सकाळी पुलाखाली उत्तमराव यांचे मृतदेह पडले असल्याचे समजताच ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. घटनास्थळी येवद्याचे ठाणेदार नितीन चरडे व दुय्यम ठाणेदार राजकुमार तायडे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा केला. घटनास्थळी दर्यापूर येथील एसडीपीओ सचिन हिरे यांनी भेट दिली. (वार्ताहर)
पुलावरून पडल्याने इसमाचा मृत्यू
By admin | Updated: March 3, 2017 00:24 IST