शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना अनुदानावर मुरघास बनविण्याचे यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 22:59 IST

जिल्ह्यात दुष्काळ स्थितीमध्ये आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचाही सहभाग आहे. यामध्ये यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत गाळपेर क्षेत्रामध्ये चारा पीके घेण्यासाठी दोन हेक्टरच्या कमाल मर्यादेत जमिनी उपलब्ध करून घेण्यासाठी ५० अर्जाचे नमुने शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गट यांना वितरीत करण्यात आले. यात कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत ५० टक्के अनुदानावर मुरघास बनविणारे यंत्राचा पुरवठा केला केला जाणार आहे.

ठळक मुद्देदुष्काळाशी लढा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात दुष्काळ स्थितीमध्ये आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचाही सहभाग आहे. यामध्ये यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत गाळपेर क्षेत्रामध्ये चारा पीके घेण्यासाठी दोन हेक्टरच्या कमाल मर्यादेत जमिनी उपलब्ध करून घेण्यासाठी ५० अर्जाचे नमुने शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गट यांना वितरीत करण्यात आले. यात कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत ५० टक्के अनुदानावर मुरघास बनविणारे यंत्राचा पुरवठा केला केला जाणार आहे.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गंत ५० टक्के अनुदानावर मुरघास बनविण्याच्या विविध क्षमतेच्या यंत्रांचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे उपस्थितांना १६ जानेवारीचे शासन निर्णयानुसार सूचित करण्यात आले. प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्प मुंबई यांनी ९ जानेवारी २०१८ च्या पत्रान्वये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गंत घटक-भाडे तत्वावर कृषी अवजारे सेवा केंद्राची निर्मिती करणे व विविध संस्था, व्यावसायिक बँका यांनी मूल्यांकन करण्याच्या व्यावसायिक प्रस्तावना सहाय्य करणे अंतर्गत मुरघास बनविण्याचे मशीन पुरवठा करणे या बाबींचा सकारात्मक विचार करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने या प्रकल्पांतर्गंत जिल्ह्यामध्ये मुरघास बनविण्याच्या विविध क्षमतेच्या यंत्रांचा पुरवठा केला जाणार आहे, त्याकरिता गरजू पशुपालकांनी संबंधित तालुक्याचे उपविभागीय कृषी अधिकाºयांकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे.या योजनेंतर्गंत लाभ घेण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या व प्रकल्पांतर्गंत गावातील कोणत्याही यंत्रणेकडे नोंदणी झालेले शेतकरी गट, स्वयंसहायता गट, बचत गट केवळ पात्र राहतील. शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गट यांच्या प्रकल्पास नोंदणीकृत बँक, वित्तीय संस्था यांचेकडून कर्ज मंजूर होणे आवश्यक आहे.काय आहे मुरघास?हिरव्या वैरणीतील उपलब्ध पोषण मूल्य घटकांचे जतन करण्यासाठी (हिरव्या वैरणीची प्रत व दर्जा कायम राखण्यासाठी) अतिरिक्त हिरवी वैरण योग्यवेळी कापणी करून वैरणीत ३० टक्के शुष्कांक (ड्रायमेंटर) व ७० टक्के आर्द्रता असताना कुट्टी करून सीलो पीट, सीलो बॅग्स, सीलो बॉल्समध्ये हवाबंद स्थितीत (अनअ‍ेरोबीक कंडीशन) मुरण्यासाठी, आंबविण्यासाठी (फरमेंटेश्न) साठविली जाते. या हिरवी वैरण साठविण्याच्या, टिकविण्याच्या पद्धतीला मुरघाट बनविणे असे संबोधिले जाते.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत भाडे तत्वावर कृषी अवजारे सेवा केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये मुरघास बनविण्याचे मशीनचा पुरवठा करण्यात येईल.- डॉ. मोहन गोहत्रेउपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन