शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

-तर ‘अड्डा २७’ चालकाविरुद्ध होऊ शकतो गुन्हा दाखल

By admin | Updated: May 13, 2017 00:04 IST

सर्वच परवानगी असल्याची बतावणी करणाऱ्या ‘अड्डा २७’ या हुक्का पार्लरच्या संचालकाने सर्वप्रथम पोलिसांची दिशाभूल केली.

पोलिसांची दिशाभूल : बाजार परवाना विभाग करणार का पोलीस तक्रार ?लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सर्वच परवानगी असल्याची बतावणी करणाऱ्या ‘अड्डा २७’ या हुक्का पार्लरच्या संचालकाने सर्वप्रथम पोलिसांची दिशाभूल केली. सहायक कामगार आयुक्त कार्यालयाच्या नोंदणी प्रमाणपत्राच्या आधारेच त्यांनी हुक्का पार्लरचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी महापालिकेच्या बाजार परवाना विभागाची परवानगी घेण्याची तसदीदेखील घेतली नाही. हा प्रकार कायदेभंग करणारा असून ही जबाबदारी असणाऱ्या बाजार परवाना विभागाने ‘अड्डा २७’ विरूद्ध पोलीस तक्रार केल्यास संचालकाविरूद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो.पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत ‘अड्डा २७’च्या संचालकाजवळ केवळ सहायक कामगार आयुक्त कार्यालयाचे नोंदणी प्रमाणपत्र आढळून आले. त्या प्रमाणपत्राच्या आधारे महापालिकेतील बाजार परवाना विभागामार्फत अधिकृत परवाना मिळतो. ही व्यवसाय सुरू करतानाची प्राथमिक प्रक्रिया आहे. मात्र, ‘अड्डा २७’ च्या संचालकांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी बाजार परवाना विभागाची परवानगी घेतली नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. यासंदर्भातील दस्तऐवज पोलिसांनी बाजार परवाना विभागाकडून मागविले आहेत.‘अड्डा-२७’कडून कायद्याचा भंग झाल्याची पुष्टी पोलीस विभागाने केली असून पोलीस आयुक्तांनी हुक्का पार्लर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, व्यवसायाबाबतचे अधिकार महापालिकेच्या बाजार परवाना विभागाकडे असल्याने बाजार परवाना विभागाकडून ‘अड्डा २७’वर काय कारवाई केली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अवैधरीत्या चालविल्या जाणाऱ्या ‘अड्डा-२७’मध्ये हुक्का पार्लरसह ‘डान्स बार’देखील चालविला जात असल्याचा आरोप बजरंग दलाने केला आहे. या अवैध व्यवसायाने अमरावतीच्या सुसंस्कृत परंपरेला डाग लागल्याने हा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे. प्राथमिक तपासणीत ‘अड्डा-२७’ जवळ परवाना नसल्याचे आढळून आले. याबाबत महापालिकेच्या परवाना विभागाकडून दस्तऐवज मागविले आहेत. त्यांनी या अवैध व्यवसायाची तक्रार दिल्यास पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल. - दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त