शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

- अन्यथा आधार कार्ड होणार निराधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 13:09 IST

आपली विशिष्ट ओळख दर्शविणारे राष्ट्रीय ओळखपत्र सलग तीन वर्षे कुठल्याही कामासाठी न वापरल्यास ‘निराधार’ होणार आहे. असे आधार कार्ड रद्द करण्याचा निर्णय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) ने घेतला असल्याचे समजते.

ठळक मुद्देतीन वर्षांत वापराची अट यूआयडीएआयचा निर्णय

सुमित हरकुट/

अमरावती: आपली विशिष्ट ओळख दर्शविणारे राष्ट्रीय ओळखपत्र सलग तीन वर्षे कुठल्याही कामासाठी न वापरल्यास ‘निराधार’ होणार आहे. असे आधार कार्ड रद्द करण्याचा निर्णय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) ने घेतला असल्याचे समजते.यूआयडीएआयच्या निर्णयामुळे बँक खाते, पॅन कार्ड, मोबाइल फोन यांना आधार क्रमांक जोडणे बंधनकारक झाले आहे. आधार कार्ड व पॅन कार्ड यावरील नाव, जन्मतारीख, जन्मवर्ष आणि छायाचित्र यात तफावत आढळल्यास, आधारची जोडणी करता येणार नाही, असेही या प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान, आधार कार्डवरील नाव, लिंग, जन्मतारीख, जन्मवर्ष इत्यादी चुका असल्यास, आधारचा वापर करताना समस्या निर्माण होऊ शकतात. अशा आधार कार्डमधील तपशिलात बदल करण्यासाठी नागरिकांना संबंधित केंद्रात सतत चकरा घालाव्या लागतात. अशांना दिलासा देण्यासाठी आता संगणकाद्वारा कुठलाही बदल नोंदविता येईल. मात्र, ज्यांचा मोबाईल क्रमांक आधारशी जोडला आहे, अशांनाच आधारसंबंधी माहितीत बदल प्राधिकरणाच्या संकेत स्थळावर करता येईल. हा बदल प्राधिकरणाने दिलेल्या मुदतीतच करणे बंधनकारक आहे. आधार कार्ड संलग्न करण्याची मुदत नुकतीच ३१ मार्च २०१९ पर्यंत वाढविण्यात आली आहे. आतापर्यंत ही मुदत तब्बल पाच वेळा वाढविण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसर्वच ठिकाणी आधार बंधनकारक असले तरी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. परंतु, याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यामुळेच सलग तीन वर्षे आधारचा वापर न केल्यास, ते निष्क्रिय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे प्राधिकरणाकडून पाठविण्यात आलेल्या ई-मेलमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड