इशारा : बच्चू कडूंनी घेतली केंद्रीय गृहमंत्र्यांची भेटअमरावती : पंतप्रधान मोदी यांनी अपंगांना ‘दिव्यांग’ हे नवीन नाव दिल्याने अपंगांचे प्रश्न सुटणार नाहीत, अपंगांचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारने सर्वात आधी ठोस धोरण जाहीर करावे, यासाठी आमदार बच्चू कडू यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची दिल्ली येथे सोमवारी भेट घेतली. अपंगांच्या मागण्यासाठी ४ एप्रिल रोजी दिल्लीला होणाऱ्या संसद घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. अपंगांच्या सर्वांगीण विकासाकरिता आजही केंद्राच्या काही जाचक अटींना सामोरे जावे लागते. अपंगांच्या विकासासाठी केंद्र सरकारने अपंग विकासाचे धोरण जाहीर करावे, अशी मागणी या भेटीत आमदार बच्चू कडू यांनी केली, अपंगांच्या हिताच्या मागण्या त्वरित मंजूर न झाल्यास महाराष्ट्रातील अपंग शक्ती ५० हजार अपंग बांधवांसह संसदेला घेराव घालेल, असा इशारा आमदार कडू यांनी दिला. (प्रतिनिधी)
अन्यथा ५० हजार अपंगांचा संसदेला घेराव!
By admin | Updated: February 2, 2016 00:09 IST