शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पांडेची अन्य विद्यार्थ्यांनींवरही होती वाईट नजर

By admin | Updated: April 16, 2017 00:04 IST

माझ्यात इन्ट्रेस असेल, तर माझ्याकडे त्या विद्यार्थिनीना आणत जा, असे भाष्य मनोज पांडेने पीडित विद्यार्थिनीसमोर केले होते.

विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण : महिला सेलला माहितीअमरावती : माझ्यात इन्ट्रेस असेल, तर माझ्याकडे त्या विद्यार्थिनीना आणत जा, असे भाष्य मनोज पांडेने पीडित विद्यार्थिनीसमोर केले होते. पीडित मुलीची महिला सेलद्वारे चौकशी करण्यात आल्यावर ही धक्कादायक बाब पुढे आली होती. त्यामुळे मनोज पांडे अन्य विद्यार्थिंनीवरही नजर ठेवून असल्याचे निदर्शनास येत आहे. क्रिएटिव्ह अ‍ॅकेडमी नावाने कोचिंग क्लासेस चालविणाऱ्या मनोज पांडेवर एका विद्यार्थिनीने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या विद्यार्थिनीप्रमाणे त्याने काही अन्य विद्यार्थिनींचेही लैंगिक शोषण केल्याची शक्यता नाकारता येत नाही. पीडित विद्यार्थिनीने तक्रार देऊन आता दहा दिवस ओलांडले आहेत. मात्र, अद्यापपर्यंत गाडगेनगर पोलिसांच्या हाती मनोज पांडे लागला नाही. गाडगेनगर पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथकही पांडेच्या शोधातच आहेत. पांडेच्या नातेवाईक, मित्र मंडळी व त्याच्या संपर्कात असणाऱ्यांची चौकशी पोलिसांमार्फत सुरू आहे. त्यांच्या संपर्कात असणाऱ्या प्रत्येक ठिकाणांची पोलिसांची झाडाझडती घेतली आहे. मात्र, तो राज्यबाहेर गेल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मनोज पांडे हा मूळचा बिहारचा असून त्याने सिंधी हिन्दी हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून त्याने कोचिंग क्लासेसचा व्यवसाय सुरू केला. त्याने कोचिंग क्लासेसच्या उद्घाटनाप्रसंगी छापलेल्या पत्रिकेवर प्रोफेसर मनोज पांडे, बी.कॉम, एम.बीए., एम.कॉम. व ट्रक्ट एम.ए. ईकोनॉमी असे नमूद केले होते. त्यामुळे मनोज पांडे उच्च शिक्षीत असल्याचे निदर्शनास येते. मात्र, असे असतानाही त्याने शिक्षक व विद्यार्थिंनीच्या संबधाना काळीमा फासल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे. पीडित विद्यार्थिनीची सर्वप्रथम महिला सेलद्वारे चौकशी करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक काळे यांनी पीडित मुलीशी संवाद साधला असता मनोज पांडे हा अन्य विद्यार्थिंनींना प्रेमजाळ्यात अडकविण्यासाठी पीडित मुलीला सांगत होता. अन्य विद्यार्थिनींना जर माझ्यात ईन्ट्रेस असेल किंवा एखाद्या मुलीला मी आवडत असेल, तर त्या विद्यार्थिनीला माझ्याकडे आणत जात, असे भाष्य पांडेने पीडित मुलीकडे केल्याचे महिला सेलमधील पोलीस अधिकाऱ्यांना चौकशीत निदर्शनास आले.