शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

-अन् कर्मचाऱ्यांनी हाती घेतले गुलेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 06:00 IST

दोन महिन्यांपासून शहरवासी माकडांच्या दहशतीखाली असताना, वनविभागाने कुठलीही कारवाई न केल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. माकडांना पिटाळून लावण्याशिवाय नागरिक, पर्यटक व कर्मचाऱ्याकडे कुठलाच पर्याय नाही. मर्कटलीला आणि चावा घेण्यासह जेवणाचे डबे पळविले जात आहेत.

नरेंद्र जावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : जिल्हा परिषद सिंचन विभागाच्या कार्यालयात कर्मचारी जेवण करीत असताना त्यांचे डबे लाल माकडांनी पळवून नेले. सोमवारी दुपारी २ नंतर हा प्रकार घडला. त्यामुळे जेवण अर्धवट सोडून कर्मचाऱ्यांना हाती गुलेर घ्यावी लागली. हातचा पेन सोडून कर्मचाऱ्यांना स्वसंरक्षणार्थ गुलेर घ्यावी लागली असताना माकडांचा बंदोबस्त करण्यात स्थानिक नगरपालिका प्रशासन सपशेल अयशस्वी ठरले आहे. गत आठवड्यात माकडाने एका कर्मचाऱ्याला चावा घेतला.चिखलदऱ्यातील अप्पर प्लेटो भागात जिल्हा परिषद सिंचन उपविभागाचे कार्यालय आहे. सोमवारी नेहमीप्रमाणे लंच टाइममध्ये जेवणाचे डबे उघडून स्थापत्य अभियंता दिलीप ढोकणे, शिपाई भक्ती, चालक वासुदेव भक्ते व इतर कर्मचारी बसले असता, माकडांनी अचानक कार्यालयात धाव घेऊन जेवणाचे डबे पळवून नेले. गत आठवड्यात मंगळवारी माकडांनी परिचर मंगेश गावले यांना चावा घेत जखमी केले होते. वरिष्ठ सहायक पंकज गुल्हाने, कनिष्ठ सहाय्यक ईश्वर राठोड यांना दररोज माकडे हाकलण्याचे कार्य करावे लागत आहे.दोन महिन्यांपासून शहरवासी माकडांच्या दहशतीखाली असताना, वनविभागाने कुठलीही कारवाई न केल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. माकडांना पिटाळून लावण्याशिवाय नागरिक, पर्यटक व कर्मचाऱ्याकडे कुठलाच पर्याय नाही. मर्कटलीला आणि चावा घेण्यासह जेवणाचे डबे पळविले जात आहेत. त्या असंतोषाचा उद्रेक होण्यापूर्वी, प्राणहानी टाळण्यासाठी माकडांना प्रतिबंध घालणे निकडीचे झाले आहे.कागदी खानापूर्तीमाकडांच्या बंदोबस्त करण्यासंदर्भात चिखलदऱ्याचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर व वनपरिक्षेत्र अधिकारी रवींद्र मुगल यांना पूर्वीच निवेदन देण्यात आले. त्यावर आम्ही आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधला, असे ठेवणीतील उत्तर मिळत असल्याने संतापात भर पडली आहे.परिसरात माकडांनी हैदोस घातला आहे. कार्यालयात येऊन चावा घेणे, डबे पळविण्याचे प्रकार होत असल्याने कर्मचारी दहशतीखाली आहेत. वनविभागाने माकडांचा तात्काळ बंदोबस्त करावा.- पंकज गुल्हाने, अध्यक्ष, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना

टॅग्स :Monkeyमाकड