शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

‘कॅन्सरला करा कॅन्सल’ विषयावर आज परिसंवादाचे आयोजन

By admin | Updated: April 22, 2017 00:19 IST

‘लोकमत’ आणि कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल यांच्यावतीने सखी मंच सदस्यांसाठी कर्करोगासंबंधी माहिती देणाऱ्या

तज्ज्ञ मार्गदर्शकांची उपस्थिती : महिलांमधील कर्करोगनिदान, प्रतिबंध विषयांवर होणार ऊहापोह अमरावती : ‘लोकमत’ आणि कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल यांच्यावतीने सखी मंच सदस्यांसाठी कर्करोगासंबंधी माहिती देणाऱ्या ‘कॅन्सरला करा कॅन्सल’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. आज शनिवार २२ एप्रिल रोजी अभियंता हॉल, शेगाव नाका चौक, अमरावती येथे सकाळी ११ ते दुपारी १ वाजता हा परिसंवाद होणार आहे. त्यात कोकिलाबेन हॉस्पिटलमधील प्रख्यात कर्करोगतज्ज्ञ योगेश कुळकर्णी, डॉ.प्रणव चढ्ढा हे मार्गदर्शन करणार आहेत. ‘लोकमत’ने कोकिलाबेन अंबानी रुग्णालयाच्या साथीने कर्करोगाबद्दल जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. कर्करोगाचे लवकर निदान झाल्यावर तो बरा होऊ शकतो. हे समजावून या घातक आजाराबाबत लोकांच्या मनात रुजलेली भीती कमी करण्यासाठी याअंतर्गत विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच हा आजार कसा बरा झाला आणि रुग्ण सामान्य जीवन कसे जगू लागले, हे दाखविण्यासाठी कर्करोगावर मात केलेल्या व्यक्तींचे अनुभव यात मांडले जाणार आहेत. या अंतर्गत तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शना खाली आणि राज्यभरातील डॉक्टरांना प्रशिक्षण अशा विविध कार्यक्रमांद्वारे कर्करोगाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यामुळे पुर्णत: नियंत्रणात आल्याची उदाहरणे आपल्यापुढे आहेत. त्यामुळे या आजाराची लक्षणे समजून घेऊन योग्य वेळेत त्याचे निदान करुन घेणे, हाच कर्करोगाच्या विळख्यातून सुटण्याचा राजमार्ग आहे. मात्र ७० टक्के लोक याची माहिती घेण्यास टाळाटाळ करताना दिसतात. ‘आपल्याला कुठे हा आजार झाला आहे, मग कशाला घ्या त्याची माहिती!’ असा त्यांचा दृष्टिकोन असतो. उर्वरित ३० टक्के लोक उत्सुकतेने याबाबत सर्व माहिती घेतात: परंतु या आजाराची सर्वच लक्षणे त्यांना स्वत:मध्ये दिसत असल्याचे त्यांना भासते. त्यामुळे ते अक्षरश: हादरून जातात. ही वेळ घेऊ नये, यासाठी या आजाराची सविस्तर माहिती या परिसंवादामध्ये देण्यात येणार आहे. सखींनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी ९९२२४२७७९४, ९३२२१४४४४४ या क्रमांकावर संपर्क साधावा.