जवाहरलाल दर्डा स्मृती दिन : लोकमत समूहाचे आयोजनअमरावती : लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृती दिनानिमित्त २ जुलै रोजी लोकमत विभागीय कार्यालय, क्रीडा संकुल, मोर्शी रोड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा उर्फ बाबुजी हे अख्खे आयुष्य सामाजिक जाणिवेतून जगले. त्यांच्या स्मृती दिनी याच जाणिवेतून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २ जुलै रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ३ वाजतापर्यंत हे शिबिर राहणार आहे. या शिबिरासाठी बडनेरा येथील संत गाडगेबाबा ब्लड बँक अँड कंपोन्ट, युनिक अकादमीचे विशेष सहकार्य लाभणार आहे. या शिबिरात लोकमत सखी मंच, युवा नेक्सच्या सदस्यांसह इतरही रक्तदात्यांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
आज रक्तदान शिबिराचे आयोजन
By admin | Updated: July 1, 2014 23:12 IST