शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय खत, बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित

By admin | Updated: October 5, 2016 00:17 IST

स्थानिक इतवारा बाजार येथो सेंद्रिय खत व बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन महापौर चरणजितकौर नंदा यांच्या हस्ते...

घनकचरा व्यवस्थापन : पाचही प्रशासकीय झोनमध्ये प्रकल्पअमरावती : स्थानिक इतवारा बाजार येथो सेंद्रिय खत व बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन महापौर चरणजितकौर नंदा यांच्या हस्ते २ आॅक्टोबर रोजी झाले. यावेळी या मशीनद्वारे खत व बायोगॅस निर्मितीची प्रक्रिया केली जाणार आहे. या प्रक्रियेने प्रदूषणाला आळा बसणार असून हा प्रकल्प इको फ्रेन्डली आहे. घरातून किंवा बाजारपेठेतून निघणारा निरुपयोगी भाजीपाला गोळा करण्यात येऊन सदर यंत्रणेद्वारे त्यावर हायड्रोलिक प्रेसने दबाव निर्माण करून त्यातील पाण्याच्या अंश बाहेर काढला जाईल व त्यापासून पुढे बायोगॅसची निर्मिती केली जाणार आहे. उर्वरित घनकचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मितीसाठी अ‍ॅटोमॅटिक एअरेशन बॉक्सेस बसविण्यात आले असून उरलेल्या चोथ्यापासून खतनिर्मिती करण्यात येणार असल्याचा मानस महापालिकेने व्यक्त केला आहे. या यंत्राची क्षमता साधारण एका दिवसाला १ टन सेंद्रिय खत निर्मिती करण्याची आहे. या प्रकल्पाद्वारे निर्माण होणारे खत महानगरपालिकेच्या बगीच्यामध्ये टाकले जाणार आहे.महापौर चरणजितकौर नंदा यांनी या प्रकल्पाची प्रशंसा केली. या प्रकल्पामुळे निरुपयोगी भाजीपाला निर्मूलन होण्यास मदत होणार असल्याचे त्या म्हणाल्या. शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. अनेक दिवसांपासून या प्रकल्पासाठी मनपा प्रयत्नरत होती. पर्यावरण अधिकारी महेश देशमुख यांच्या संकल्पनेतून आणि हव्याप्रमंच्या मदतीने हा प्रकल्प साकरण्यात आल्याची माहिती यावेळी यंत्रणेने दिली.वेस्टेज भाजीपालावर प्रक्रिया करणारे हे युनिट आहे. नागरिकांनी खराब झालेला भाजीपाला या प्रकल्पाच्या ठिकाणी आणून दिल्यास या प्रकल्पाद्वारे त्या खराब भाजीपाल्याचे निर्मूलन होऊ शकणार आहे. अमरावतीकर नागरिकांनी या प्रकल्पाला प्रतिसाद दिल्यास निरुपयोगी भाजीपाला निर्मूलन करणे सुलभ होईल. तसेच या प्रकल्पातून सेंद्रीय खत व बायोगॅसची निर्मिती होणार आहे. या प्रकल्प उभारणीसह उर्वरित झोनमध्ये आॅर्गेनिक प्रकल्प कार्यान्वित केले जाणार असल्याचे आयुक्त पवार म्हणाले. कचऱ्याचे पृथ्थकरण करून ओला व सुका कचरा वेगळा देण्यात यावा. यामधील आॅर्गेनिक कचरा स्वतंत्र उपलब्ध झाल्यास त्यावर प्रक्रिया करणे सोईचे होईल. यामधील आॅर्गेनिक कचरा स्वतंत्ररीत्या उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.या कार्यक्रमास मनपा आयुक्त हेमंतकुमार पवार, अतिरिक्त आयुक्त सोमनाथा शेटे, नगरसेवक मिलींद बांबल, नगरसेविका कुसूम साहू, दिव्या सिसोदे, उपायुक्त विनायक औगड, नरेंद्र वानखडे, पर्यावरण अधिकारी महेश देशमुखा, हनुमान व्याया प्रसारक मंडळाचे इंजिनिअरींगचे प्राचार्य ए.बी. मराठे, वेस्टबीन सोल्यूशनचे संचालक प्रशांत चेंडके, शहर अभियंता जीवन सदार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नेताम, नगरसचिव मदन तांबेकर, सहाय्यक आयुक्त योगेश पीठे, निवेदिता घार्गे, सोनाली यादव, मंगेश वाटाणे, उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर, संगणक कक्षप्रमुख अमित डोंगरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)