शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
3
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
4
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
5
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
6
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
7
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
8
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
9
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
10
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
11
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
12
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
13
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
14
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
15
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
16
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
17
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
18
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
19
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

सेंद्रिय कर्ब हा जमिनीच्या सुपिकतेचा खरा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:12 IST

अमरावती : सेंद्रिय कर्ब हा जमिनीच्या सुपिकतेचा खरा आधार असल्याने तो वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे सेंद्रिय कर्बाची ...

अमरावती : सेंद्रिय कर्ब हा जमिनीच्या सुपिकतेचा खरा आधार असल्याने तो वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे सेंद्रिय कर्बाची मात्रा ०.२० ते ०.३० टक्क्यांपर्यंतच आहे. शाश्वत शेती उत्पादनासाठी सर्व अन्नद्रव्यांसोबत सेंद्रिय कर्बाचा समतोल राखला गेला तरच आवश्‍यक अन्नद्रव्ये झाडाला उपलब्ध होत असतात, असे संशोधन श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालयाचे प्राचार्य शशांक देशमुख यांनी नोंदविले. जागतिक मृदा दिनानिमित्त शनिवारी त्यांनी रहाटगाव येथील शेतकऱ्यांना माती परीक्षणासंदर्भात मार्दर्शन केले.

जेव्हा कार्बन वायू हवेत असतो तेव्हा पर्यावरण दूषित होते आणि हाच कार्बन वायू सेंद्रिय कर्बाच्या रुपात जमिनीत मिसळला गेला तर जमिनीची सुपिकता वाढविण्यास सर्वात महत्त्वाची भूमिका निभावतो. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जितके जास्त तितका जमिनीचा पोत सुधारतो. त्याकरिता पिकांचे अवशेष न जाळता त्यापासून चांगल्या प्रकारचे कंपोस्ट खत निर्माण केल्यास शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यास मदत होते. आपल्या जमिनीत सेंद्रिय कर्ब आणि इतर अन्नद्रव्यांची किती उपलब्धता आहे, हे जाणून घेण्यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे आहे.

बॉक्स

असे करावे माती परीक्षण

शेतातील मातीचे परीक्षण करून घेण्यासाठी जमिनीचा रंग, उतार आणि उत्पादकतेनुसार विभाग करून प्रत्येक भागातून एक प्रातिनिधिक नमुना परीक्षणासाठी जमा करावा. त्या जागेवरील काडीकचरा बाजूला करून १५ ते २० सेंटीमीटर खोल व्ही आकाराचा खड्डा करून त्यातील खडे विरहीत माती गोळा करावी. असे पाच ते दहा ठिकाणची माती एकत्र करून त्याचे चार भागात विभाजन करावे. अर्धा किलो माती कापडी पिशवीत भरावी. त्यावर शेतकऱ्यांनी आपले नाव, पत्ता, जमिनीचा सर्वे क्रमांक लिहून पिशवीवर लावावी. हा नमुना जवळच्या कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग किंवा कृषी विद्यापीठाच्या मृदा परीक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी द्यावा. प्राप्त माती परीक्षण अहवालाप्रमाणे आवश्यक असेल तेच अन्नद्रव्य घटक खताच्या रुपाने पिकांना द्यावे. त्यामुळे खतावरील खर्च कमी करून जमिनीच्या उत्पादकतेची शाश्वतता टिकविता येते, असे शशांक देशमुख म्हणाले.