शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

यादी प्रसिद्धीनंतरच बदली आदेश द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 22:15 IST

जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाइन बदली प्रक्रिया सुरू आहे. बुलडाणा व धुळे जिल्ह्यात बदली झालेल्या शिक्षकांची यादी आणि नंतर त्यांच्या बदलीचे आदेश सीईओंकडे पाठविले होते.

ठळक मुद्देशिक्षक संघटनांची मागणी : थेट आदेशाला शिक्षकांचा विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाइन बदली प्रक्रिया सुरू आहे. बुलडाणा व धुळे जिल्ह्यात बदली झालेल्या शिक्षकांची यादी आणि नंतर त्यांच्या बदलीचे आदेश सीईओंकडे पाठविले होते. मात्र, त्या याद्यांमधील चुकीच्या प्रकारावर शिक्षकांनी आक्षेप घेतला. याची दखल घेत ग्रामविकास विभागाने इतर जिल्ह्याच्या याद्या जाहीर न करता थेट बदली आदेश पाठविण्याचा प्रकार सुरू केले. यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. बदली झालेल्या शिक्षकांच्या याद्या अगोदर प्रसिद्ध करा नंतरच आदेश काढा, अशी मागणी आता पुढे येत आहे. शिक्षक बदल्यांचे आदेश राज्यस्तरावर एनआयसीमार्फत सीईओंकडे पाठविले जात आहेत. विभागातील बुलडाणा जि.प.ला बदल्यांचे आदेश मिळाले. मात्र, त्यापूर्वी त्यांना बदलीच्या याद्या पाठविल्या त्यात उणिवा दिसल्याने शिक्षकांमध्ये गोंधळ उडाला. ज्या शाळेत एकच पद रिक्त असेल तेथे दोघांना बदली आदेश देण्यात आला. संवर्ग १ मधील कोणत्या शिक्षकाने बदली नकार दिला. दिव्यांग नसलेल्यांनी बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे याचा लाभ घेतला. सेवाज्येष्ठ शिक्षकांना पसंतीक्रमाने २० पैकी एकही गाव मिळाले नाही. मात्र, कनिष्ठ शिक्षकांना पसंतीक्रमातीलच गाव मिळाले. सेवाज्येष्ठता तर डावलण्यात आलीच.उलट कनिष्ठने वरिष्ठाला खो दिला, असे अनेक गोंधळ बुलढाणा व धुळे जिल्ह्यात दिसून आले. त्यामुळे एनआयसीने इतर जिल्ह्याच्या याद्या अद्याप मुहूर्त लांबणीवर टाकला आहे.अशातच वाशिम जिल्हा परिषद थेट आदेश पाठविले. हा प्रकार पाहून जिल्ह्यातील शिक्षक ‘सजग’झाले आहेत. बदल्याची यादी न पाठविता थेट बदली आदेश दिल्यास अनेकांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. याविरोधात काहींनी थेट न्यायालयात जाण्याची तयारी चालविली आहे.सात दिवसांचा अवधी का नाही ?शिक्षक बदलीचा आदेश जिल्हा परिषदेत धडकताच एका दिवसातच नव्या शाळेत रुजू होण्याचे बंधन घातले आहे. प्रत्यक्षात ज्यांनी प्रशासकीय बदलीसाठी अर्ज केले, त्यांना नियमानुसार सात दिवसांचा अवधी मिळणे आवश्यक आहे. मात्र, तसे न करता त्वरित रुजू होण्याच्या सूचना दिल्या आहेत. आॅनलाईन बदल्यामध्ये अनेक उणिवा बाहेर येत असताना त्याला न जुमानता ३१ मे च्या 'डेडलाइन'साठी ग्रामविकास विभागाने ही खटाटोप चालविल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे.बदली यादी प्रसिद्ध कराव्यात, त्याशिवाय पारदर्शक शब्दाला अर्थ उरणार नाही. यादी प्रसिद्धीपूर्वीच थेट आदेश देणे म्हणजे दडपशाहीचाच प्रकार आहे. ७० शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्यांमुळे त्यांच्यावर अन्याय होईल.- किरण पाटील, राज्य उपाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ