वरूड /पुसला : स्थानिक जिल्हा परिषद शाळा इयत्ता ७ वीपर्यंत, तर दोन खासगी शाळा दहावीपर्यंत आहे. १० च्या विद्यार्थ्याना शिक्षण देण्याकरिता ६२ वर्षांपासून हायस्कूल आहे. परंतु जिल्हा परिषद शाळेत इयत्ता ८ वीची परवानगी देऊन नियमबाह्य वर्ग सुरू झाल्याने शिक्षणाधिकारी यांनी वर्ग बंद करण्याचे आदेश दिले होते. परंतु शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकाने न्यायालयाचा दरवाजा ठोठावून स्थगनादेश मिळविला होता. परंतु न्यायालयाने नुकताच स्थगनादेश उठविल्याने गटशिक्षणाधिकारी यांनी जी.प. शाळेचा वर्ग बंद करण्याचे आदेश देऊनसुद्धा वर्ग बंद केला नाही. न्यायालयाच्या आणि शिक्षण विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. या हेकेखोरपणामुळे खासगी शाळांचे वर्ग बंद पडण्याची वेळ आली आहे.
पुसला जिल्हा परिषद पूर्व माधयमिक मुलीची शाळा यांनी ८ वा वर्ग सुरूच ठेवला आणि उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात धाव घेऊन स्थगनादेश मिळविल्याने वर्ग सुरु आहे. परंतु न्यायिक प्रकरणात न्यायालयाने २८ ऑक्टोबर २०२० ला सदर स्थगिती उठविल्याने सदर न्यायिक प्रकरणाचा अंतिम निर्णयाचे अधीन राहून कार्यवाही करून तसा अहवाल पाठविण्याचे आदेश शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद अमरावती यांनी २८ जुलै २०२१ ला पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांना पत्र पाठविले होते. यानुसार गटशिक्षणधिकारी वरूड यांनी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा (मुले) पुसला यांना ५ आगस्टला पत्र देऊन वर्ग ८ वा बंदबाबत कारवाही करून तास अहवाल पाठविण्याचे आदेश आहे . मात्र सर्व आदेशाला केराची टोपली दाखवून हेकेखोरपणामुळे अनधिकृत वर्ग सुरु आहे. यामुळे मुलांच्या भाविष्याचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना होत आहे. या प्रकरणात कोणती कार्यवाही होणार याकडे ग्रामवासीयांचे लक्ष लागले आहे.