अमरावती : विदर्भातील प्रमुख शेती उत्पादन असलेल्या संत्र्यांकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. संत्र्यावर प्रक्रिया करणारा उद्योग नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने १४ नोव्हेंबर रोजी अमरावती येथे संत्रा उत्पादक, व्यावसायिक, शेतकऱ्यांची परिषद घेण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. धैयवर्धन पुंडकर, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा, जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी दिली.
----------------------
अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांचा आज मोर्चा
अमरावती : राज्य शासनाच्या अक्षम्य धोरणामुळे मागासवर्गीय अनुदानित वसतिगृहातील दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी येथील इर्विन चौक स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून सकाळी ११ वाजता कर्मचाऱ्यांचा मोर्चा निघणार आहे. कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करून मोर्चाला प्रारंभ होईल, अशी माहिती श्रीकृष्ण सगणे, सुभाष सोनारे, विवेक जावरकर, संजय देशमुख यांनी दिली.