शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

डेप्युटी सीईओंच्या दालनात विरोधकांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2016 00:10 IST

जिल्हा परिषदेमधील रिक्त असलेल्या विषय समितीमधील पदे भरण्यासाठी १२ जानेवारी रोजी बोलविण्यात आलेल्या सभेत नामाकंन अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आली नाही.

जिल्हा परिषद : विषय समितीचा वाद, सदस्य आक्रमकअमरावती : जिल्हा परिषदेमधील रिक्त असलेल्या विषय समितीमधील पदे भरण्यासाठी १२ जानेवारी रोजी बोलविण्यात आलेल्या सभेत नामाकंन अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आली नाही. या विरोधात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रकाश तट्टे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करीत लेखी उत्तराची मागणी रेटून धरली.जिल्हा परिषद अध्यक्षांनी मंगळवारी जिल्हा परिषदेतील विषय समितीमध्ये रिक्त असलेली पदे भरण्यासाठी सभा बोलविली होती. मात्र या सभेत २९ मे रोजीच्या सभेतील विषय सूचीनुसार सदस्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात येईल असे नमूद आहे. परंतु १२ जानेवारीला झालेल्या सभेबाबतच्या नोटीसमध्ये प्रशासन व अध्यक्षांकडून ही चूक हेतुपुरस्पर करण्यात आली असल्याने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुरेखा ठाकरे, माजी सभापती मनोहर सुने, चंद्रपाल तुरकाने आदींनी सभेपूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल पाटील यांच्याकडे लेखी स्वरूपात पत्र दिले होते. या पत्रानुसार सुरेखा ठाकरे, मनोहर सुने, चंद्रपाल तुरकाने आदींचे दोन समितीमध्ये अर्ज आहेत. परंतु कलम १८(१) च्या तरतूदी नुसार आम्हाला एकाच समितीवर निवडून जाण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्हाला कोणत्याही एका समितीवर अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात यावा व त्यानंतरच पुढील प्रक्रिया करण्यात यावी, अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली होती. याबाबत जाब विचारण्यासाठी सुरेखा ठाकरे, मनोहर सुने, चंद्रपाल तुरकाने, आदीसह सुधिर सूर्यवंशी, अभिजित ढेपे, प्रमोद वाकोडे,प्रवीण मुंदडा, सदाशिव खडके, जया बुंदिले, कविता दामेधर, अर्चना मुरूमकर, प्रेमा खलोकार आदींनी ठिय्या दिला होता. मात्र सभेची नसती प्रशासनाला अप्राप्त असल्याने आपण यावर प्रशासनाच्यावतीने मत मांडू शकत नसल्याचे डेप्युटी सीईओंनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)