शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 22:23 IST

सन १९५६ मध्ये भारतातील आधुनिक वैद्यकीय व्यवसाय व वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेचे नियमन करण्याच्या दृष्टीने मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाची स्थापना करण्यात आली.

ठळक मुद्देआयएमएची पत्रपरिषद : भावी डॉक्टरांचे भविष्य धोक्यात

आॅनलाईन लोकमतअमरावती : सन १९५६ मध्ये भारतातील आधुनिक वैद्यकीय व्यवसाय व वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेचे नियमन करण्याच्या दृष्टीने मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाची स्थापना करण्यात आली. पण, आता नव्याने राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) विधेयक आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याने व वैद्यकीय क्षेत्रात पुरेसा अनुभव नसलेल्या अवैद्यकीय लोकाद्वारा चालविल्या जाण्याचा घाट रचला जात असून, याला आयएमएचा विरोध आहे. या विधेयकाच्या विरोधात देशभर ठिकठिकाणी महायात्रा काढण्यात येत असल्याची माहिती (प्रोफेशन प्रोटेक्शन स्किम - पीपीएस) चे अध्यक्ष डॉ. कृष्णा पराते यांनी शनिवारी पार पडलेल्या पत्रपरिषदेमध्ये यांनी दिली.मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया ही एक पारदर्शक संघटना बरखास्त करून केंद्र सरकारने वैद्यकीय शिक्षणासंबधी अत्यल्प माहिती असलेल्या अवैद्यकीय प्रतिनिधींचा भरमार असलेल्या आयोेग (एनएमसी) कमिशन स्थापन करण्याचा प्रयत्न चालविले आहे. सदर विधेयक आमच्या व अनेक राजकीय पक्षाच्या खासदारांच्या विरोधामुळे संसदेच्या स्टँडिंग कमिटीकडे पाठविण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य आयएमएचे उपाध्यक्ष डॉ. संजय देशपांडे यांनी यावेळी दिली. सदर आयोगातील तरतुदी या भावी डॉक्टरांच्या भविष्यावर विपरीत परिणाम करणारी आहेत तसेच ब्रिज कोर्सव्दारे आयुष डॉक्टरांना सहा महिन्यांचे जुजबी प्रशिक्षण देऊन अ‍ॅलोपॅथी व्यवसाय करण्याची परवानगी दिली जाईल, असेही यामध्ये नमूद करण्यात आल्याचे आयएमएचे माजी राज्य उपाध्यक्ष वसंत लुंगे यांनी स्पष्ट केले.आयोगातील तरतुदींमुळे पाल्यांचे डॉक्टर होेण्याची स्वप्न धुळीस मिळू शकते. कारण शासकीय कोटा कमी करून स्वत: फी ठरविण्याचा अधिकार असलेल्या खासगी जागांचा कोटा सरकारच्या मर्जीनुसार वाढविण्यात जाणार आहे. सर्व राज्यांना समान प्रतिनिधित्व मिळवण्याचा अधिकार या प्रस्तावित आयोगात हिरावून घेण्यात येणार आहे. या आयोगातील तरतुदीनुसार केवळ पाच राज्यांना साखळी पद्धतीने प्रतिनिधित्व दिले जाईल तसेच अत्यंत कठीण असलेली वैद्यकीय प्रवेश परीक्षा व वैद्यकीय अभ्यासक्रम उत्तीर्ण करूनही वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना मिळविण्यासाठी आणखी एक कठीण परीक्षा (एक्झीट एक्झाम ) द्यावी लागणार आहे.विद्यापीठांशी घेतलेल्या परीक्षांना महत्त्वच उरणार नाही. सगळ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रुग्ण तपासून शिकविण्याऐवजी एक्झिट परीक्षेची तयारी करावी लागेल. असल्याची माहिती नागपूरच्या अध्यक्ष वैशाली खंडाई यांनी दिली. यावेळी अमरावती आयएमएचे अध्यक्ष बी.आर. देशमुख, दिनेश ठाकरे, सचिव दिनेश वाघाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.