शहरं
Join us  
Trending Stories
1
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
2
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
3
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
4
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
6
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
7
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
8
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
9
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
10
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
11
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
12
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
13
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
14
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
15
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
16
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
17
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
18
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
19
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
20
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली

चांदूर बाजार समितीच्या मतदानाच्या दिवसावर आक्षेप

By admin | Updated: July 22, 2015 00:46 IST

येत्या १३ सप्टेंबरला होऊ घातलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे.

पोळ्याच्या करीला मतदान : १५६९ मतदार निवडणार १८ संचालकसुरेश सवळे  चांदूरबाजारयेत्या १३ सप्टेंबरला होऊ घातलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. इच्छुकांनी उमेदवारी अर्जासाठी ‘फिल्डिंग’ लावणे सुरू केले आहे. काहींना आपल्या उमेदवारीची शाश्वती आहे तर काही आपल्या नेत्यांच्या आदेशाची प्रतीक्षा करीत आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर होताच जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानाची तारीख १३ सप्टेंबर निश्चित केली आहे. या तारखेला ‘पोळ्याची कर’ येत असल्यामुळे व हा सण शेतकऱ्यांशी निगडित असल्यामुळे याचा मतदानावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता बाजार समितीचे माजी सभापती मंगेश देशमुख यांनी वर्तविली आहे. त्यामुळे ही तारीख बदलविण्याची मागणी त्यांनी स्थानिक निवडणूक अधिकाऱ्याकडे केली आहे. बाजार समितीच्या या निवडणुकीला ना आचारसंहितेचे बंधन, ना खर्चाची मर्यादा हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे. या बाजार समितीच्या निवडणुकीत १५६९ मतदार आपला हक्क बजावून १८ संचालक निवडणार आहेत. दरम्यान मतदानाच्या दिवसावर आक्षेप घेण्यात आल्यामुळे मतदानाची तारीख एक दिवसाने वाढण्याची शक्यता असून तसे शुध्दीपत्रक जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडून काढले जाणार असल्याची माहिती आहे. बाजार समितीची निवडणूक कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम १९६३ नियम १९६७ नुसार घेण्यात येते. सहकार कायद्याचे नियम यास लागू होत नाहीत. सहकार क्षेत्रातील वावरणारे दिग्गज नेते या निवडणुकीत सहभागी होत असले तरी बाजार समितीचे नियम व निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे या निवडणुकीला आचारसंहिता व खर्चाचे बंधन लागू होत नाहीत. त्यामुळे धनदांडग््या व वजनदार व्यक्तींना ही निवडणूक खूपच सोपी असते. सहकारी संस्थांच्या निवडणुुका सहकार कायद्यानुसार होतात. त्याकरिता सहकार आयुक्त व त्यांच्या निर्देशानुसार निवडणुका घेणे सहकारी संस्थांना बंधनकारक असतात. त्यांना निवडणूक आयोगाच्या नियमावलीचे बंधन असते. परंतु बाजार समित्या या समिती कायद्याखाली पंजीबध्द असल्याने या निवडणुकांना निवडणूक आयोगाची आचारसंहिता लागू होत नाही. त्यामुळे खर्चाचे विवरण देणे हेदेखील उमेदवारांना बंधनकारक राहत नाही. सहकार क्षेत्रातील कोणत्याही संस्थांना उलाढालीपेक्षा बाजार समित्यांचा लेखा-जोखा मोठा असतो. त्यामुळे समिती निवडणुकरिता नेत्यांना अधिक आकर्षण असते. साहजिकच या निवडणुका साधारण वातावरणात होऊ शकतच नाहीत. आचारसंहिता व खर्चाची बाब सोडली तर निवडणुकांतील नियमाप्रमाणे सर्वच घरतील उमेदवार संचालक पदाकरिता निवडणूक लढवू शकतात. १९६९ मतदार निवडणार १८ संचालकसेवा सहकारी संस्था मतदारसंघातून ११ संचालक निवडून द्यायचे आहे. त्यात सर्वसाधारण ७, महिला २, ओबीसी १, विमुक्त भटक्या जाती, जमाती १ यात एकूण ५३८ मतदार आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघातून सर्वसाधारण २, अनुसूचित जमाती १, आर्थिक दृष्ट्या दुर्बल १ असे चार उमेदवार निवडून देण्याची जबाबदारी या मतदारसंघातील ५८१ मतदारांवर असणार आहे. २६० मतदार व्यापारी-अडते मतदारसंघातून दोन संचालक तर १९० मतदार हमाल-मापारी मतदारसंघातून १ संचालक निवडणार आहेत. जसापूर ग्रामपंचायत चांदूरबाजार पंचायत समितीमधून प्रत्येकी एक स्वीकृत संचालक असतो.कृषी उत्पन्न बाजार समिती ही कायद्यानुसार पंजीबध्द असते. त्यामुळे अधिनियम १९६३ नियम १९६७ नुसार समितीच्या निवडणुका घेणे बंधनकारक असते. यात आचारसंहिता व खर्चाचे विवरण देणे उमेदवारांना बंधनकारक नसते. पोळ्याच्या करीच्या दिवशी होणाऱ्या मतदानाच्या तारखेवर आक्षेप घेण्यात आल्याची माहिती वरिष्ठांना कळविण्यात आली आहे. त्यांच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.- अनिरुध्द राऊ त, निवडणूक निर्णय अधिकारी, बाजार समिती चांदूरबाजार.