शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘सूर रायझिंग स्टारचे’मधून मिळणार प्रतिभावान गायकांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:27 IST

आपल्या प्रत्येकामध्ये कोणते ना कोणते टॅलेंट असते. अनेक कारणास्तव त्याला संधी मिळत नाही. कधी आर्थिक कारणांमुळे, कधी कौटुंबिक कारणांमुळे, तर कधी व्यासपीठच न मिळाल्यामुळे अनेक कलावंत समाजासमोर येतच नाहीत.

ठळक मुद्दे२० जानेवारीला : कलर्स व लोकमत समूहाचा उपक्रम

अमरावती : आपल्या प्रत्येकामध्ये कोणते ना कोणते टॅलेंट असते. अनेक कारणास्तव त्याला संधी मिळत नाही. कधी आर्थिक कारणांमुळे, कधी कौटुंबिक कारणांमुळे, तर कधी व्यासपीठच न मिळाल्यामुळे अनेक कलावंत समाजासमोर येतच नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन जनसामान्यांतील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्या कला, कौशल्य प्रतिभेला नवे पंख देण्यासाठी लोकमत समूह नेहमीच तत्पर असतो. विविध कार्यक्रम, स्पर्धा, टॅलेंट शो आयोजित करून या ‘उद्या’च्या सुपरस्टार्सना प्रकाशझोतात आणले जाते.सुरांचे देणं लाभलेल्या प्रतिभावान गायकांना एक नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी 'लोकमत' आणि कलर्स वाहिनी आगळावेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. ‘सूर रायझिंग स्टार’चे असे त्याचे नाव. कलर्स व लोकमतद्वारे आयोजित ही गायन स्पर्धा २० जानेवारीला अभियंता हॉल, शेगाव नाका चौक, व्हि.एम.व्हि. रोड, अमरावती येथे दुपारी ४ वाजता होणार आहे. यात ४ वर्षांवरील मुले-मुली, स्त्री-पुरुष सहभागी होऊ शकतात.विशेष म्हणजे या प्रयत्नांना यंदा साथ मिळाली ती कलर्स वाहिनीची. मनोरंजनाच्या दुनियेत एकापेक्षा एक सरस कार्यक्रमांची निर्मिती करून छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांच्या घराघरांमध्ये कलर्सने बोलबाला निर्माण केला आहे. शुद्ध, कौटुंबिक, संस्कारक्षम कार्यक्रमातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यासोबत सामाजिक बांधिलकी जोपासणारेही अनेक उपक्रम राबविले जातात.कार्यक्रम स्थळी वेळेवर नोंदणी करता येणार नाही. स्पर्धेची अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी अधिक माहितीसाठी : लोकमत कार्यालय, विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती 9850304087, 9850911887, 9922968526 या क्रमांकावर संपर्क करावा.‘रायझिंग स्टार’च्या निमित्ताने कलर्स वाहिनी घेऊन येत आहे भारतातील पहिल्या लाईव्ह रिअ‍ॅलिटी शोचे दुसरे पर्व, ज्याद्वारे मोडल्या जाणार विचारांच्या चौकटी. आता तुम्ही म्हणाल की, विचारांची चौकट म्हणजे काय? समाजाने आपल्या भोवती अशा काही चौकटी निर्माण केल्या आहेत, ज्या आपल्या विकासाला मारक ठरतात. भाषा, जात, आर्थिक स्थिती, धर्म अशा विविध चौकटींची आज काहीही एक गरज नाही. अशा चौकटींचे बंधने झुगारून आपले टॅलेंट जगासमोर आणणाºया गायकांना या चौकटी मोडण्यास मदत म्हणून या 'शो'च्या माध्यमातून तुम्ही देशाच्या कोणत्याही कानाकोपºयातून लाईव्ह व्होटींग करू शकता. यामध्ये साथीला आहेत भारतातील तीन सुप्रसिद्ध महारथी परीक्षक, गायक व संगीतकार शंकर महादेव, गायिका मोनाली ठाकूर आणि अभिनेता व गायक दिलजित दोसांज. परंतु, खरे परीक्षक तर कलर्स वाहिनी पाहणारे देशातील १३० कोटी भारतीयच असणार आहेत. मग या सिझनमध्ये केवळ विचारांच्या चौकटीत नाही मोडल्या जाणार, तर देशातील प्रतिभावान गायकांचे नशीबही बदलणार आहे. कलर्स वाहिनीवर २० जानेवारीपासून दर शनिवार-रविवारी रात्री ९ वाजता सुरू होत आहे देशातील एकमेव लाईव्ह सिंगिंग रिअ‍ॅलिटी शो ‘‘रायझिंग स्टार’’.