शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिकेबाबत विरोधकांचे आरोप बिनबुडाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:14 IST

वरूड : कोवीड सारख्या महाभयंकर आजारामध्ये विरोधकाकडून केवळ राजकारण केल्या जात आहे. गेल्या वर्षभरात भाजपाच्या बंडखोर ११ नगरसेवकांनी सत्ता ...

वरूड : कोवीड सारख्या महाभयंकर आजारामध्ये विरोधकाकडून केवळ राजकारण केल्या जात आहे. गेल्या वर्षभरात भाजपाच्या बंडखोर ११ नगरसेवकांनी सत्ता स्थापनेव्यतीरिक्त कोणतेही कामाकडे लक्ष दिले नाही. शहरात कोरोना रुग्ण वाढत असताना काही मोजके नगरसेवक कार्यरत असतांना सत्ताधारी गटाचे बंड खोर नगरसेवकांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्या स्थानिक विकास निधीतून आलेल्या रुग्णवाहिकेची राजकारण करून गालबोट लावण्याचं प्रयत्न आणि बिनबुडाचे आरोप करून नागरिकांची दिशाभूल करीत असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळू पाटील यांनी दिले . तसेच सर्वसामान्यांच्या सेवेत हि रुग्नावाहिका असताना नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्याचे कारस्थान करू नये असा सल्ला विरोधकांना पत्रपरिषेदेतून देण्यात आला .

वरुड शहर कोरोना महाभयंकर आजारासह पाणी टंचाई, रस्ते, नाल्या दुरुस्ती, सफाई इत्यादी आवश्यक कामाकडे सुध्दा या नगरसवेकांचे लक्ष नाही. बाजार ओटे तयार असून दिले जात नाही. महात्मा फुलेंच्या पूतळ्यांची विटंबना आहे . छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूतळ्यांचा प्रश्न अधांतरी आहे, शहरात कोठेही कंटेनमेंट झोन नाहीत, कचराकुंडी वाटपामध्ये प्रचंड भष्टाचार आहे. हे सर्व असतांना हे कोविड साथ सांभाळण्यात अयशस्वी ठरलेल्या नगर परिषदेतील पदाधिक्कारि , नगर सेवक असणाऱ्यानी राजकारणांच्या श्रेयासाठी रुग्णवाहीकेची मागणी करणे ही शोकांतीका असल्याचे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळू पाटील , शहराध्यक्ष जितेंन शाह , नगरसेवक महेंद्र देशमुख यांनी सांगितले . भाजपाच्या नगरसेवक आणि उपाध्यक्षांनी केले आरोप बिनबुडाचे असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न आहे . भाजपाचे नगरसेवक , सभापती , स्विकृत, नगराध्यक्ष सत्ता बदल यातच कार्यरत होते. शहरविकासाच्या कामाला सुद्धा खीळ बसली होती . मला पाहूण मत द्या म्हणणारे डॉ. अनिल बोंडे सुद्धा रक्तदान शिबीराव्यतीरिक्त शहरात दिसून आले नाही.केवळ राजकारण करून कामाला खीळ लावण्याचे काम हे करीत असल्याचा आरोप करण्यात आला. आ. देवेंद्र भुयार यांनी २५ आगस्ट २०२० रोजी जिल्हाधिकाज्यांकडे रुग्णवाहीकेसंदर्भात जिल्हा नियोजन समिती च्या योजनेतून रुग्णवाहीका खरेदीसाठी नगरपालिकेला आदेश द्यावा असे पत्र दिले होते. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार २१ सप्टेंबर २०२० रोजी वरुड नगरपरिषदेची विशेष सभा आयोजीत करण्यात आली होती . सदर सभेमध्ये आ. भुयार यांच्या सूचनेनूसार कार्डीयाक रुग्णवाहीका व साधी रुग्णवाहीका खरेदी करणे, फायर ब्रीगेडची गाडी खरेदी करणे, वरुड येथे दोन स्वागतगेट बांधकाम करणे, छत्रपती शिवाजी चौक येथे सौदर्यीकरण करणे इत्यादी कामे ठरावात ठेवले असतांना याच कर्तव्यदक्ष नगरसेवकांनी वरील ठराव नामंजूर केले . मात्र ज्यांना जनतेची काळजीच नाही त्यांच्या हातात रुग्णवाहीका देणे म्हणजे माकडाच्या हातात कोलीत देण्यासारखे असल्याचे सुद्धा पत्रकार परिषदेत सांगितले . कोरोना साथरोगामध्ये जीवनरक्षक प्रणालीसह रुग्णवाहिका असणे काळाची गरज असल्याचे पाहून आ. देवेंद्र भुयार यांनी आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२०-२०२१ या योजनेतून रुग्णवाहीका खरेदी करण्यासंदर्भात पून्हा पत्र दिले. सर्व सोपस्कार पूर्ण करुन २ मार्चला रुग्णवाहीके करिता प्रशासकीय मान्यता मिळाली. कोवीड परिस्थिती लक्षात घेता नगर परीषद वरुड ला असलेली रुग्णवाहीका ग्रामीण रुग्णालय वरुड व बेनोडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथील रुग्णवाहीका मोर्शी येथील कोविड रुग्णालयाला देण्यात यावी. या करीता जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला. पत्रव्यवहारानूसार जिल्हाधिकारी यांनी दोन रुग्णवाहीका हस्तांतरीत करण्यात आल्या . या रुग्णवाहिकेची देखभाल दुरुस्ती एसडीआरएफ निधीमधून खर्च देण्यात येण्याची सूचना केली . २३ एप्रिल पासून रुग्णवाहीका प्रत्यक्ष रुग्णांच्या सेवेत दाखल झाल्या . तेंव्हा पासून ६७ रुग्ण अमरावती नागपूर ला ने आन केली परंतु नगर परिषदेच्या सत्ताधारी भाजपाच्या नगर सेवक पदाधिकाऱ्यानी आमदार हे स्वतःहाच्या कार्यकर्त्यांसाठी रुग्णवाहिका वापरत असल्याचा आरोप करण्यात आले . परंतु रुग्णवाहिका स्वतःसाठी , नातेवाईक किंवा कार्यकर्त्यांसाठी वापरली नसून सामान्यांसाठी सेवा देत आहे . बिनबुडाचे आरोप करून विरोधकांनी राजकारण न करता समाजकारण करावे असेही राष्ट्रवादी काँग्रेस ने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये तालुकाध्यक्ष बाळू पाटील , शहराध्यक्ष जितेंन शाह , नगरसेवक महेंद्र देशमुख , स्वप्नील आजनकर यांनी सांगितले . यामुळे तालुक्यात स्थानाईक विकास निधीतून आलेल्या रुग्णवाहिकेवरून राजकारण सुरु झाले आहे .