शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाच्या मुद्यावर विरोधक एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2016 23:55 IST

जिल्हा परिषदेत पंचायत विभागाच्या अखत्यारित असलेल्या २५-१५ लोकपयोगी कामे ..

जिल्हा परिषद : आक्रमक भूमिका घेण्याची तयारीअमरावती : जिल्हा परिषदेत पंचायत विभागाच्या अखत्यारित असलेल्या २५-१५ लोकपयोगी कामे या शिर्षांतर्गत ४.५० कोटी रूपयांच्या निधीचे नियोजनात समसमान निधी वाटपाला तिलाजंली देवून परस्परच नियोजन केल्याने विरोधी सदस्य आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सत्ताधारी व विरोधी सत्तामध्ये राजकीय कलह वाढण्याची शक्यता बळावली आहे. जिल्हा परिषद चालू आर्थिक वर्षात २५-१५ या लेखा शिर्षाखाली लोकपयोगी लहान कामे करण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो सामान्य प्रशासन विभागामार्फत अध्यक्षांकडे सभेत ठेवण्यासाठी पाठविणे आवश्यक होते. मात्र जिल्हा परिषदेच्या ६ जून रोजी आयोजित सर्वधारण सभेत चालू आर्थिक वर्षात ४.५० कोटी रूपयांच्या दीडपट म्हणजे ६.५० कोटींच्या २०० कामांचे नियोजन करण्यात आले आहे. यात सत्ताधारी सदस्याचा काहीसा अपवाद वगळता विरोधी पक्षाचे सदस्यांना बोटावर मोजण्या इतकाच निधी देण्यात आला आहे. सत्ताधाऱ्यांची ही खेळी आता विरोधी पक्षाचे सदस्यांनी गांभिर्याने घेत या विरोधात आक्रमक लढा उभारण्याची तयारी सुरू केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे २५-१५ या लेखाशिर्षांचे नियोजन करताना विरोधी पक्षाच्या सदस्यांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या मुद्यावर जिल्हा परिषदेत राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना विकासाच्या नियोजनावर राजकीय कलह सुरू झाल्याने या कामात अडथळा निर्माण होणार आहे. एकीकडे राजकीय मतभेद चव्हाटयावर येत असताना दुसरीकडे प्रशासनाने मात्र याविषयी सावध भूमिका घेतल्याचे चित्र आहे. लोकोपयोगी लहान कामे या लेखाशिर्षांतून जिल्ह्यातील प्रस्तावित केलेली विकास कामे या मतभेदामुळे मार्गी लागणार की नाही? याबाबतही शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत रंगलेल्या या राजकीय विषयाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)प्रशासनाची डोकेदुखीजिल्हा परिषदेत २५-१५ या लेखाशिर्षांतील साडेचार कोटी रूपयांचे नियोजन केल्याने सदस्यांमध्ये कलह वाढला आहे. मात्र यात प्रशासकीय कामकाज हाताळण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या संबंधित विभागाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. या विषयावर कधी पडदा पडतो, अशी चर्चा जिल्हा परिषदेत जोर धरु लागली आहे.