शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

निरंकुश बिल्डर, अधिकाऱ्यांवर फौजदारीची मात्रा

By admin | Updated: August 9, 2016 23:55 IST

पैशाच्या जोरावर अशक्य ते शक्य करून बेकायदा बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना धडा शिकविण्यासाठी फौजदारीची मात्रा शोधण्यात आली आहे.

साखळीला बसणार का ब्रेक? : प्रभावी अंमलबजावणीची गरज अमरावती : पैशाच्या जोरावर अशक्य ते शक्य करून बेकायदा बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना धडा शिकविण्यासाठी फौजदारीची मात्रा शोधण्यात आली आहे. प्रशासनातील लाचखोर अधिकारी-कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन मोजक्याच काही लोकांनी हा गोरखधंदा सुरू केला आहे. बेकायदेशिर बांधकाम करणारे बिल्डर आणि लाच घेऊन त्या अवैध बांधकामाला खतपाणी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची रवानगी थेट तुरूंगात करण्याचे सरकारच्या विचाराधिन आहे. राज्यातील अनधिकृत इमारती बांधणारे बांधकाम व्यावसायिक व अशा बांधकामांना झुकतेमाप देणाऱ्या अधिकाऱ्यांना लवकरच फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. अनधिकृत बांधकामासंदर्भातील नवीन धोरणामध्ये या कारवाईचा अंतर्भाव करण्यात आल्याने बेकायदेशिर बांधकाम करणाऱ्यांचे धाबे तुर्तास दणाणले आहेत. महापालिका व अन्य प्राधिकरणांनी या निर्णयाला तिलांजली न दिल्यास निरंकुश झालेल्या अभद्र युतीला आळा बसू शकेल, अशी सर्वसामान्यांची धारणा आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे सरकारने अनधिकृत बांधकामाबाबतचे नवीन धोरण तयार केले आहे. या धोरणामध्ये सार्वजनिक सोईसाठीची आरक्षणे, रस्ते व अन्य विकासकामांसाठी आरक्षित जमीन तसेच १:५ उतार असलेल्या जमिनीवरील बेकायदा बांधकामे नियमित केली जाणार नाहीत. चटई क्षेत्राचे उल्लंघन तसेच अन्य नियमांची पायमल्ली झाल्यास दंड भरुन ती नियमित केली जाईल. मूळ बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई अनधिकृत बांधकामाच्या नवीन धोरणामध्ये बेकायदेशिर बांधकाम करणाऱ्या मूळ बांधकाम व्यावसायिकावर कारवाईचा समावेश आहे. अनेक बांधकाम व्यावसायिकांनी बेकायदा बांधकामे करुन फ्लॅटची विक्री केली आहे. या इमारतींमध्ये नागरिक रहिवासी झाल्याने इमारती पाडल्यास नागरिकांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे अशा बेकायदेशिर इमारती बांधणारे बांधकाम व्यावसायिक व त्यांना सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर बडगा उगारला जाईल. या बेकायदेशिर बांधकामासाठी त्यांना दोषी ठरवून फौजदारी कारवाई केली जाणार आहे.