शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

ऑपरेशन ऑलआऊट; २४५ पोलीस उतरले रस्त्यावर; गुन्हेगारीवर वचक

By प्रदीप भाकरे | Updated: October 14, 2024 16:45 IST

तडीपारांवर कारवाई : वाहनचालकांना दंड, वान्टेड आरोपींना पकडले

अमरावती : आगामी नवदुर्गा विसर्जन व सण उत्सव अनुषंगाने गुन्हेगारांवर वचक निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह मालमत्तेच्या गुन्हयांवर अंकुश लावण्याकरीता जिल्हयात ११ ऑक्टोबर रोजी रात्री १ ते सकाळी पाचपर्यंत ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबविण्यात आले. यात पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, पोलीस उप अधिक्षक, ठाणेदार असे एकूण ४४ पोलीस अधिकारी व २०१ पोलीस अंमलदार सहभागी झाले.

            या मोहिमेदरम्यान महत्वाचे रस्त्यांवर, जिल्हयाचे, राज्य सिमेवर सशस्त्र नाकाबंदी नेमून वाहने व सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. गुन्हेगारांची आश्रयस्थाने, तडीपार आरोपी, पकड वॉरंटमधील आरोपींची तपासणी करण्यात आली. ग्रामीण हद्दीतील धाबे, हॉटेल, लॉजेसची चौकशी करण्यात आली आहे. रेकॉर्डवरील ‘पाहिजे’ म्हणून घोषित असलेल्या विक्की मधुकर घोडेस्वार (रा. मांजरखेड, ता. चांदुर रेल्वे) यास स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. येवदा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अब्दुल अकील अब्दुल वहिद (वय ३० वर्ष, रा. येवदा) याच्याविरुध्द शस्त्र अधिनियमान्वये कार्यवाही केली. गोपाल लोंडे (४५, वरुड), प्रमोद धाकतोडे (२५, येवदा), आकाश डोईफोडे (२४, परतवाडा) या तिघांवर गुन्हा करण्याच्या तयारीने फिरत असल्याचा संशय निर्माण झाल्याने त्यांचेविरुध्द एलसीबीकडून कारवाई करण्यात आली.

पकड वारंटमधील सात पकडले

पकड वॉरंटमधील एकुण सात आरोपींना अटक करण्यात आली. १२ जमानती वॉरंट व ९ समंन्स बजावणी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान ५४ वाहनांवर कार्यवाही करण्यात आली.अवैध दारुविरुध्द एकुण आठ केसेस करुन २४ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मोर्शी, शिरजगाव कसबा व स्थानिक गुन्हे शाखा मिळून रेती चोरी कारवाईच्या तीन कारवाईत १६ लाख २० हजारांचा तर, येवदा येथे गोवंशांच्या एका कारवाईत ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

"अचानकपणे सुरू करण्यात आलेल्या या ऑपरेशन ऑलआऊट मोहिमेमुळे समाजकंटक व गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांवर चांगलाच वचक बसला आहे. अशा प्रकारच्या मोहीम सतत राबविण्यात येणार आहेत."- विशाल आनंद, पोलीस अधीक्षक, अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावती