शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मिनीमंत्रालयातील समाजकल्याण प्रभारींवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:18 IST

अमरावती : ग्रामीण भागाशी संबंधित असलेल्या जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला गत सहा वर्षांपासून नियमित अधिकारी नसल्यामुळे या विभागाचा कारभार ...

अमरावती : ग्रामीण भागाशी संबंधित असलेल्या जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला गत सहा वर्षांपासून नियमित अधिकारी नसल्यामुळे या विभागाचा कारभार अद्यापही प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू आहे. विशेष म्हणजे, गत सहा वर्षात सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे या विभागाला वाली नसल्याचे चित्र असून या ठिकाणी नियमित अधिकारी केव्हा मिळणार, हा खरा प्रश्न आहे.

समाजकल्याण विभागामार्फत विविध महत्त्वाच्या योजना राबविल्या जातात. या योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यावर आहे. मात्र, दोन वर्षांपासून या विभागाला नियमित अधिकारी मिळालेला नाही. आतापर्यंत सहा प्रभारी अधिकारी या ठिकाणी नियुक्त करण्यात आले होते. त्यांनाही आता अन्यत्र नियुक्ती देण्यात आल्याने समाजकल्याण विभागाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवरच चालू आहे. जिल्हा समाजकल्याण विभागाचे पद भरण्यासाठी सीईओ,पदाधिकारी यांनी सतत पाठपुरावा केल्यावरही याची दखल अद्यापही घेण्यात आली नाही.

कोट

समाजकल्याण विभागाला नियमित अधिकारी नियुक्त करावा, याकरिता अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सभापती म्हणून शासनाकडे पद भरण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे आणि करीत आहोत.

- दयाराम काळे, सभापती, समाजकल्याण समिती, जिल्हा परिषद

यांनी सांभाळली धुरा

n मीना अंबाडेकर - २१ जून २०१७ ते २८ जून २०१८

n चेतन जाधव - २८ जून ते २६ नोव्हेंबर २०१८

n प्रशांत थोरात - २६ नोव्हेंबर २०१८ ते २३ जानेवारी २०१९

n अमोल यावलीकर - २३ जानेवारी ते १७ जून २०१९

n दीपा हेरोडे - १० जून २०२० ते ३ फेब्रुवारी २०२१

n राजेंद्र जाधवर - ६ मे पासून अद्याप