शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या ३५ वाहनांना लागले स्पीड गव्हर्नर!

By admin | Updated: April 24, 2016 00:14 IST

वाढते अपघात टाळण्यासाठी प्रवासी व मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वेग मर्यादेसाठी ‘स्पीड गव्हर्नर’ बसविण्याचा निर्णय घेण्यात आला.

जिल्ह्यात हजारो वाहने : नियमांची प्रतारणाअमरावती : वाढते अपघात टाळण्यासाठी प्रवासी व मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वेग मर्यादेसाठी ‘स्पीड गव्हर्नर’ बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबाबत अधिसूचनाही काढण्यात आली. मात्र या लोकाभिमुख अधिसूचनेला लाखो वाहन चालकांनी ठेंगा दाखविला आहे. अमरावती जिल्ह्यात स्पीड गव्हर्नर लावणे बंधनकारक असलेल्या हजारो वाहनांपैकी केवळ ३५ वाहनांना आतापर्यंत स्पीड गव्हर्नर लावण्यात आले आहेत. प्रवासी वाहतूक करणारी व मालवाहतूक करणारी वाहने स्पर्धेसाठी वेगमर्यादा वाढत नाहीत. त्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. यात एसटीही मागे नाही. त्यामुळे हे टाळण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून उपाययोजना करण्याचा विचार सुरू होता. त्यावर ३० सप्टेंबर २०१५ रोजी ‘नोटीफिकेशन’ काढण्यात आले व १ आॅक्टोबर २०१५ पूर्वी उत्पादित केलेल्या सर्व प्रकारच्या स्कूल बसेस, घातक वस्तू वाहून नेणारी परिवहन संवर्गातील वाहने, डंपर्स आणि टँकर्ससह एसटी बसेसना ‘वेग नियंत्रक’ बसविणे अनिवार्य केले आहे. त्यासाठी विहित कालावधी देण्यात आला व त्यानंतर १ एप्रिल २०१६ पासून वेगनियंत्रक बसविणे अनिवार्य केले आहे. मात्र या अनिवार्यतेकडे वाहन मालकांसह एसटी महामंडळाने पाठ फिरविली. (प्रतिनिधी)नूतनीकरण रखडले होते१ एप्रिल २०१६ पासून स्पीड गव्हर्नर अर्थात वेगनियंत्रक अनिवार्य करण्याच्या आदेशाची प्रादेशिक परिवहन विभागाने काटेकोर अंमलबजावणी केली. या अनिवार्यतेमुळे एसटी बससह हजारो ट्रकचे पासिंग रोखले गेले. त्यामुळे महामंडळासह ट्रक मालकांचे नुकसान झाले. तथापी हजारो-लाखो वाहनात स्पीड गव्हर्नर लागले नाहीत. उलट त्याला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी आली.३१ जुलैपर्यंत मुदतवाढएसटी बसेससह हजारो ट्रक व अन्य अवजड वाहनांचे स्पीड गव्हर्नरऐवजी पासिंग रोखण्यात आले. त्यामुळे केंद्र शासनाशी वाटाघाटी करण्यात आल्या. त्यानंतर स्पीड गव्हर्नर लावून घेण्याला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तथापी १ एप्रिलपासून अमरावती जिल्ह्यातील केवळ ३५ वाहनांनी स्पीड गव्हर्नर लावून घेतले आहेत. जिल्ह्यातील हजारो वाहनांना अनिवार्यजिल्हा आगारातील एसटी बसेससह सुमारे ५० हजारांहून अधिक वाहनांना स्पीड गव्हर्नर बसविणे बंधनकारक आहे. यात ट्रक, डंपर्स आणि घातक वस्तू वाहून नेणाऱ्या परिवहन संवर्गातील वाहनांन्चा समावेश आहे.