शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अप्पर वर्धात केवळ २६ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 22:10 IST

शहरासह अमरावतीला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा प्रकल्पात केवळ २६.३१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्या दोन महिन्यांत या साठ्यात झपाट्याने घट झाली आहे. त्यामुळे अमरावतीकरांवर पाणीकपातीचे काळे ढग आहेत. गतवर्षी १५ जानेवारीस या धरणात तब्बल ६७.०६ टक्के इतका जलसाठा शिल्लक होता. त्यात यंदा निम्म्यापेक्षाही अधिक घट झाली आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईचे संकेत : दैनंदिन पुरवठ्याचे नियोजन कोलमडले

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : शहरासह अमरावतीला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा प्रकल्पात केवळ २६.३१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्या दोन महिन्यांत या साठ्यात झपाट्याने घट झाली आहे. त्यामुळे अमरावतीकरांवर पाणीकपातीचे काळे ढग आहेत. गतवर्षी १५ जानेवारीस या धरणात तब्बल ६७.०६ टक्के इतका जलसाठा शिल्लक होता. त्यात यंदा निम्म्यापेक्षाही अधिक घट झाली आहे.मराठवाडा व पूर्व विदर्भावर भीषण पाणीटंचाईचे संकट आहे. अप्पर वर्धा प्रकल्पाची पाणीपातळी खालावल्याने अमरावती शहरावरदेखील पाणीटंचाईचे सावट आहे. शहराला मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. अमरावतीकरांची तृष्णा भागविण्यासाठी अप्पर वर्धा जलाशय हे उपयुक्त आहे. इतरत्र पाणीटंचाई असताना, या धरणाने आजवर अमरावतीकरांना कधीही धोका दिला नाही, असा इतिहास आहे. परंतु, यावर्षी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.अप्पर वर्धा धरणाची क्षमता ५६४.०५ दशलक्ष घनमीटर आहे. यात ११४.२२ दलघमी मृत साठा धरल्यास एकूण क्षमता ६२८.२७ दलघमीपर्यंत पोहोचतो. तथापि, सध्या धरणात १४८.३९ दशलक्ष घनमीटर म्हणजेच २६.३१ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या दोन महिन्यांत पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे.औष्णिक विद्युत प्रकल्पाला देखील पाणीअप्पर वर्धा धरणातून अमरावतीला पाणीपुरवठ्यासोबतच उजव्या व डाव्या कालव्यातून सिंचनाची सोय करण्यात येते. रब्बी हंगामामध्ये सिंचनासाठी धरणातून पाणी सोडले जाते. नांदगाव पेठ येथील कोळशावर आधारित रतन इंडिया कंपनीच्या सोफिया या औष्णिक विद्युत प्रकल्पालादेखील पाणी सोडण्यात येते. वीज प्रकल्प गतवर्षीपासून सुरू झाला व त्यानंतर धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात घटत गेल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.