शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठात कौशल्य विकासाचे आॅनलाईन प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 11:05 IST

देशभरात २७ विद्यापीठांना मंजूर झालेल्या केंद्रापैकी कौशल्य विकास हा महत्त्वाचा विषय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला दिलेला आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय ज्ञानस्रोत केंद्र मंजूर पाच विद्यापीठांमध्ये अमरावतीचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विद्यापीठ व महाविद्यालयीन प्राचार्य आणि शिक्षकांना कौशल्य विकासाचे आॅनलाईन प्रशिक्षण मिळावे, यासाठी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्यावतीने देशभरातील विद्यापीठांमध्ये विविध महत्वपूर्ण शैक्षणिक विषयांवर राष्ट्रीय ज्ञानस्रोत केंद्र (एनआरसी) मंजूर केले आहे. देशभरात २७ विद्यापीठांना मंजूर झालेल्या केंद्रापैकी कौशल्य विकास हा महत्त्वाचा विषय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला दिलेला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात कौशल्य विकासाला चालना दिली असून, अमरावती विद्यापीठाला मिळालेल्या एनआरसी केंद्राच्या माध्यमातून आता देशभरातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांच्या प्राचार्य व शिक्षकांना कौशल्य विकासाचे आॅनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. केंद्रीय विद्यापीठ आयोगाने नुकतीच देशभरातील विद्यापीठांचे कुलगुरू आणि मनुष्यबळ विकास केंद्राच्या संचालकांची दिल्ली येथे बैठक घेतली. त्या बैठकीत एनआरसी कार्यान्वयासंदर्भात माहिती दिली. यापूर्वी विद्यापीठात मानव संसाधन विकास केंद्राची स्थापना झाली असून, त्या केंद्राच्या माध्यमातून महाविद्यालयीन शिक्षकांना उद्बोधन व उजळणी वर्गाला आमंत्रित केले जायचे. महिनाभर चाललेल्या प्रशिक्षणात शिक्षकांचा पूर्ण वेळ व्यतीत व्हायचा. राष्ट्रीय ज्ञानस्रोत केंद्रामुळे आॅनलाईन प्रशिक्षण प्राप्त होत असल्यामुळे शिक्षकांचा वेळ व शासनाच्या कोट्यवधी रुपयांची बचत होणार आहे. विद्यापीठाला दिलेल्या कौशल्य विकास या अभ्यासक्रमाकरिता एनआरसी अंतर्गत स्वतंत्र विद्वत परिषदेचे गठण होणार असून, त्यामध्ये इतर नामांकित संस्थांमधून पाच सभासद आणि तांत्रिक तज्ज्ञांचा समावेश असेल. विद्वत परिषदेच्या माध्यमातून अद्ययावत ओरिएन्टेशन मॉड्यूल्स दरवर्षी तयार केले जातील. याशिवाय प्रशिक्षण देण्यासाठी परिषदेच्या माध्यमातून रिसोर्स पर्सनची निवड केली जाणार आहे. ‘स्वयम्’ या आॅनलाईन प्रशिक्षण सुविधेच्या माध्यमातून शिक्षक त्यांच्या सोयीनुसार अभ्यासक्रम पूर्ण करतील. त्यांची परीक्षा आॅनलाईन होईल व त्यानंतर आयोगाचे प्रमाणपत्र मिळेल.शिक्षकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण राष्ट्रीय ज्ञानस्त्रोत केंद्राच्या माध्यमातून मिळणार असल्यामुळे त्याचा फायदा विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यामुळे या भागातील विद्यार्थी रोजगारक्षम होतील, असा विश्वास कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र