शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर महिलेचा ऑनलाईन पाठलाग : मेसेज पाठवून केले डिलिट

By प्रदीप भाकरे | Updated: January 11, 2024 14:15 IST

अज्ञात मोबाईल युजरने आपला छुपा पाठलाग चालविल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

अमरावती: मी तुम्हाला आज जवळून बघितले, तुम्ही खुप सुंदर आहात, छान वाटले. तुम्ही घराचे दार खिडक्या लावत जा, असे व्हॉट्सॲप मेसेज टाकत एका डॉक्टर महिलेचा ऑनलाईन पाठलाग करण्यात आला. ३ ते ८ जानेवारीदरम्यान ही घटना घडली. फ्रेजरपुरा पोलिसांनी याप्रकरणी ९ जानेवारी रोजी पrडित महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात व्हॉट्सॲप युजरविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, एक डॉक्टर महिला ३ जानेवारी रोजी सकाळी मेडिकल कॉलेजला पोहोचली तेव्हा तिला तिच्या व्हॉटसॲपवर अनोळखी मोबाईल क्रमांकावरून हाय असा मेसेज दिसला. नंबर ओळखीचा नसल्याने त्यांनी त्याला उत्तर दिले नाही. पुन्हा त्याच मोबाईल क्रमांकावरून नो रिप्लाय? असा मेसेज आला. म्हणून त्यांनी त्या क्रमांकावर हॅलो तुम्ही मला ओळखता का, असा मेसेज केला. डॉक्टर महिलेने त्याला नाव विचारले. मात्र त्याने सांगितले नाही. त्यामुळे त्यांनी रिप्लाय देणे बंद केले. तरीदेखील त्या क्रमांकावरून त्यांना वारंवार व्हॉटसॲप मेसेज आलेत. तुम्ही डोळयाच्या डॉक्टर आहात, मला माहीत पडले, असा मेसेज देखील केला. त्यानंतर ५ जानेवारी रोजी डॉक्टर महिला बाहेरगाावी गेल्या असता गावाला गेलात का, असे मेसेज त्यांना त्याच क्रमांकाहून आलेत. दरम्यान ८ जानेवारी रोजी सायंकाळी त्या घरी असतांना पुन्हा त्याच मोबाईल क्रमांकावरुन त्यांना व्हॉट्सॲप मेसेज आले. त्यात मी तुम्हाला आज जवळून बघितले, तुम्ही सुंदर आहात छान वाटले. तुम्ही घराचे दरवाजे खिडक्या लावत जा, असे मेसेज होते. त्याने ते नंतर डिलिट देखील केले. मात्र त्यांनी ते बघितले होते. अज्ञात व्हॉट्सॲपधारक थांबायचे नावच घेत नसल्याने अखेर त्यांनी ९ जानेवारी रोजी पोलीस ठाणे गाठले. अज्ञात मोबाईल युजरने आपला ऑनलाईन छुपा पाठलाग चालविल्याचे त्या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती