शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

आॅनलाईन सातबारा, सर्व्हरवर लोड

By admin | Updated: February 25, 2016 00:10 IST

शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आॅनलाईन सातबारा जिल्ह्यात सुरू करण्यात आला. मात्र सर्व्हरवरील लोड वाढून ही वेबसाईट वारंवार हँग होत आहे.

अभिलेख अद्ययावतीकरण : तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढलीअमरावती : शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आॅनलाईन सातबारा जिल्ह्यात सुरू करण्यात आला. मात्र सर्व्हरवरील लोड वाढून ही वेबसाईट वारंवार हँग होत आहे. त्यामुळे सातबारा काढण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. परिणामी आॅनलाईन सातबारा तलाठ्यासाठी व नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. केंद्र सरकारकडून राष्ट्रीय भूमिलेख अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत सातबारा, सहा ‘ ड’ व आठ ‘अ’ स्कॅन करुन डाटा एन्ट्री करण्यात जिल्ह्याने बाजी मारली. दोन वर्षांपासून याचे काम सुरू होते. गेल्या अनेक वर्षांपासून धुळखात पडलेले स्कॅन करुन सीडी तयार करण्यात आल्या. पुणे येथे जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडे त्या पाठविण्यात आल्या. सीडीमधील दस्तऐवज या कार्यालयाने शासनाच्या ‘महाभुलेख महाराष्ट्र’ या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले. त्यानंतर दोन महिन्यात अमरावती व एक, दोन तालुके वगळता उर्वरित तालुक्यामधील सातबारा, सहा ‘ड’ व आठ ‘अ’ वेबसाईटवर उपलब्ध झाले. मात्र ही वेबसाईट वारंवार हँग होते. त्यामुळे काही क्षणात उपलब्ध होणारा सातबारा मिळण्यास बराच अवधी लागत आहे. परिणामी एका चकरेत शेतकऱ्यांचे काम होत नाही. सातबाऱ्यासाठी सर्व्हरवरील लोड कमी होण्याची प्रतीक्षा करावी लागते. सरकारच्या डिजीटल इंडिया उपक्रमाव्दारे इतरही सेवा महा ई-सेवाकेंद्राच्या माध्यमातून गावात पोहचल्या. पण ही यंत्रणा सुरळीत चालावी, यासाठी हवे असणारे नेटचे जाळे सरकारने उपलब्ध केले नाही. सातबाऱ्याची भूमीअभिलेख ही वेबसाईट याचे मुर्तीमंत उदाहरण आहे. ही वेबसाईट मुंबई येथील सर्व्हरशी जोडलेली आहे. संपूर्ण राज्यासाठी हे एकमेव सर्व्हर आहे. त्याची क्षमता देखील कमी आहे. संकेतस्थळाला २०० हून अधिक शेतकऱ्यांनी भेटी दिल्यास ती हँग होते, असा अनुभव आहे. सर्व्हरवर लोड झाल्यानंतर ते डाउन होते. यामुळे आधुनिक युगातही सरकारची ही यंत्रणा तांत्रिक मागासलेपणाचे दर्शन घडवीत आहे. ग्रामीण भागात रेंज नसल्यामुळे आॅनलाईन सेवांचा डोलारा कोसळला असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळते. (प्रतिनिधी)रेंजसाठी विजेची बोंबरेंज मिळाली तर लाईटची बोंब, वेबसाईटवरुन सातबाऱ्याची प्रिंट देता यावी, यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडे लॅपटॉप आहेत. यासाठी प्रशासनाने डोंगल दिले आहेत. लॅपटॉपला डोंगल जोडून वेबसाईटवरुन डिजीटल स्वाक्षरीची प्रिंट दिली जाते. ही प्रिंट देण्यासाठी रेंज मिळत नाही. आणि रेंज मिळाली तर वीज गायब होते, असे चित्र आहे. तलाठ्यांचे दफ्तर सरकारजमाआॅनलाईन सातबारा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे हस्तलिखित सातबारा, सहा ‘ड’, आठ ‘अ’ देणे बंद झाले आहे. तलाठी व मंडळ अधिकारी यांचे दफ्तर सरकार जमा करण्यात आले आहे. परंतु ग्रामीण भागात वेबसाईटवर सुरू होत नसल्याने तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते.